निफ्टी निर्देशांकांने सातत्याने १७,५०० चा स्तर राखल्यास निर्देशांकाचे प्रथम वरचे लक्ष्य १७,७०० ते १७,८०० असे असेल. निफ्टी निर्देशांकांने १७,५०० ते १७,८०० स्तरावर पायाभरणी केल्यास, १७,८०० चा अवघड टप्पा पार करत निफ्टी निर्देशांकाचे दुसरे वरचे लक्ष्य १८,१०० असेल. ही नाण्याची एक बाजू (तेजीची बाजू) असेल.

निफ्टी निर्देशांक १७,७०० ते १७,८०० चा अवघड टप्पा (स्तर) पार करण्यास वारंवार अपयशी ठरल्यास, निफ्टी निर्देशांक १७,३०० ते १७,२०० स्तरापर्यंत खाली घसरू शकतो. या घसरणीत निफ्टी निर्देशांकांने १७,२०० चा स्तर राखण्याची नितांत गरज आहे. येणाऱ्या दिवसांत निफ्टी निर्देशांक १७,२०० चा स्तर राखण्यास अपयशी ठरल्यास, गुंतवणूकदारांनी सावध होऊन मंदीची मानसिक तयारी ठेवावी. निफ्टी निर्देशांकाचे खालचे लक्ष्य १६,८०० ते १६,५०० असेल.

Leave a Reply