विमा पॉलिसी कागदपत्राच्या स्वरूपात ठेवण्याच्या त्रासातून तुमची लवकरच सुटका होणार आहे. या वर्षी डिसेंबरनंतर येणार्‍या सर्व नवीन पॉलिसी डिजिटल असतील आणि त्या डिमॅट खात्यात येतील. यासोबतच जुन्या विमा पॉलिसीचेही पुढील १२ महिन्यांत डीमॅट फॉर्ममध्ये रूपांतर केले जाईल. विमा नियामक IRDA ने त्याला मान्यता दिली आहे.

IRDA ने विमा कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. IRDA च्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले की ही नवीन पॉलिसी आरोग्य, वाहन, जीवन विमा अशा सर्व प्रकारच्या पॉलिसींना लागू असेल.

काय फायदा होईल

  • डिजिटल असल्याने तुम्ही कधीही कुठेही पॉलिसी तपशील पाहू शकाल
  • कागदपत्राच्या स्वरूपात ठेवण्याचा त्रास टाळला जाईल
  • पॉलिसीच्या नूतनीकरणाच्या वेळी कागदपत्रांची गरज भासणार नाही
  • कागद आणि वेळेची बचत करण्यासोबत खर्चाची बचत करण्यात प्रभावी
  • तुमच्या डिमॅट खात्यांचे संरक्षण कसे करावे

दरम्यान, सध्याच्या काळात डिजिटलमध्ये व्यवहार आणि इतर व्यवसाय वाढल्याने हॅकिंगचे धोकेही वाढले आहेत. आतापर्यंत डिमॅटमध्ये फक्त शेअर्स आणि म्युच्युअल फंड येत होते. पण आता विमाही त्याच्या कक्षेत येणार आहे. सर्वप्रथम डीमॅट खात्याशी संबंधित प्रत्येक अपडेटसाठी एसएमएस सुविधा घ्या, ज्यामुळे तुम्हाला सर्व व्यवहारांची माहिती मिळेल. नेहमी नियमित अंतराने डीमॅट खात्याचे तपशील तपासा.

अभिप्राय द्या!