क्रिसकॅपिटल (ChrysCapital) कडून गुंतवणूक असलेल्या भारतातील सर्वात मोठ्या फार्मा कंपन्यांपैकी एक मॅनकाइंड फार्मा आपला IPO आणणार आहे. मॅनकाइंड फार्माने शेअर बाजार नियंत्रक सेबीकडे आयपीओसाठी अर्ज दाखल केला आहे. कंपनीचा हा आयपीओ ५५८७ कोटी रुपयांचा असू शकतो. आपला मेगा IPO आणण्यासाठी कंपनीने गुंतवणूक बँकर्सशी आधीच प्रारंभिक चर्चा सुरू केली होती.

मॅनकाइंड फार्मा या कंपनीत ChrysCapital व्यतिरिक्त कॅपिटल इंटरनॅशनल आणि सिंगापूरच्या GIC चीही गुंतवणूक आहे. कंपनीचा IPO मुख्यत्वे ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत येऊ शकतो. कंपनीने हा IPO आणला तर तो फार्मा क्षेत्रातील दुसरा सर्वात मोठा IPO ठरू शकतो. या क्षेत्रातील सर्वात मोठ्या आयपीओचा विक्रम ग्लँड फार्माच्या नावावर आहे. Gland Pharma ने नोव्हेंबर २०२० मध्ये ८६९ दशलक्ष डाॅलरचा IPO आणला होता.

Leave a Reply