या वर्षी जुलैमध्ये सेबीने सोशल स्टॉक एक्स्चेंज सुरू करण्याचे नियम अधिसूचित केले होते. विना नफा काम करणाऱ्या संस्था (NPOs) एसएसईवर सूचीबद्ध केल्या जातील. सोशल एंटरप्रायझेस अंतर्गत येणारे नफ्याचे उद्योग, विना नफा संस्था सोशल स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध करण्यास सक्षम असतील. सोशल स्टॉक एक्सचेंज सध्याच्या शेअर ट्रेडिंगच्या स्टॉक एक्स्चेंजपेक्षा पूर्णपणे भिन्न असेल. इंग्लंड, कॅनडा आणि ब्राझील सारख्या देशांमध्ये एसएसई आधीच अस्तित्वात असून भारतात SSE साठी मोठी बाजारपेठ आहे. भारतात ३१ लाखांहून अधिक एनपीओ आहेत. म्हणजेच प्रत्येक ४०० भारतीयांमागे एक एनपीओ आहे.
बीएसईला सोशल स्टॉक एक्स्चेंज सुरू करण्यासाठी तत्वतः मान्यता मिळाली आहे. शेअर बाजाराचे नियामक, सेबीने बीएसईला स्वतंत्र सामाजिक स्टॉक एक्सचेंज सुरू करण्याची परवानगी दिली आहे. सेबीने बीएसईला स्वतंत्र सोशल स्टॉक एक्सचेंज सुरू करण्यास तत्वतः मान्यता दिल्याचे BSE ने नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर नियामक फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे.