LIC च्या या योजनेचे नाव सरल पेन्शन (Saral Pension) आहे जी एकल प्रिमियम पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये प्रिमियम फक्त पॉलिसी घेताना भरावा लागतो. यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहील. इतकंच नाहीतर पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर एकल प्रिमियमची रक्कम नॉमिनीला परत केली जाईल. सरल पेन्शन योजना ही एक तत्काळ वार्षिकी योजना आहे, याचा अर्थ तुम्ही पॉलिसी घेताच तुम्हाला पेन्शन मिळू लागतं. ही पॉलिसी घेतल्यानंतर जेवढी पेन्शन सुरू होते तेवढीच पेन्शन आयुष्यभर मिळते.

ही पेन्शन योजना घेण्याचे दोन मार्ग आहेत…

सिंगल लाईफ – यामध्ये पॉलिसी कोणा एकाच्या नावावर असेल. जोपर्यंत पेन्शनधारक जिवंत आहे तोपर्यंत त्याला पेन्शन मिळत राहील. त्याच्या मृत्यूनंतर मूळ प्रिमियमची रक्कम त्याच्या नॉमिनीला परत केली जाईल.

या योजनेच्या लाभासाठी किमान वयोमर्यादा ४० वर्षे आणि कमाल ८० वर्षे आहे. ही संपूर्ण आयुष्य पॉलिसी असल्याने, पेन्शनधारक जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पेन्शन मिळेल. सरल पेन्शन पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांनंतर कधीही सरेंडर केली जाऊ शकते.

कधी मिळणार पेन्शन ?

हे पेन्शनधारकांनी ठरवायचं आहे. यामध्ये तुम्हाला ४ पर्याय मिळतात. तुम्ही दर महिन्याला, दर तीन महिन्यांनी, दर ६ महिन्यांनी पेन्शन घेऊ शकता किंवा १२ महिन्यांनी घेऊ शकता. तुम्ही कोणताही पर्याय निवडाल, त्या कालावधीत तुमची पेन्शन येण्यास सुरुवात होईल.

किती पेन्शन मिळणार?

या सरल पेन्शन योजनेसाठी तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील. याचा विचार केला तर जर तुम्हाला दरमहा पेन्शन हवी असेल तर तुम्हाला किमान १००० रुपये पेन्शन, तीन महिन्यांसाठी ३००० रुपये, ६ महिन्यांसाठी ६००० रुपये आणि १२ महिन्यांसाठी १२००० रुपये मिळतील.

अभिप्राय द्या!