मायक्रोलेंडर कंपनी फ्यूजन मायक्रोफायनान्स (Fusion Microfinance IPO)लवकरच आपला प्रारंभिक समभाग विक्री (IPO) शेअर बाजारात आणणार आहे. कंपनीचा आयपीओ २ नोव्हेंबरपासून सुरू होत असून तो ४ नोव्हेंबरपर्यंत खुला असेल. म्हणजेच ४ नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूकदार या आयपीओमध्ये पैसे गुंतवू शकतात. कंपनीचे मुख्यालय दिल्लीत आहे. कंपनी तिच्या आयपीओ (IPO) द्वारे ६०० कोटी रुपयांचा नवीन इश्यू जारी करणार आहे आणि त्यात ऑफर फॉर सेलचाही समावेश आहे. कंपनी विद्यमान भागधारक आणि प्रवर्तकांचे १३,६९५,४६६ शेअर्सचे ऑफर फॉर सेल देखील आणणार आहे.

ही कंपनी देशातील आर्थिवदृष्ट्या वंचित असणाऱ्या महिलांना आर्थिक सेवा पुरवते. यामुळे महिलांना जास्तीत जास्त आर्थिक संधी मिळण्यास मदत होते. या कंपनीने जॉइंट लायबिलिटी ग्रुप मॉडेलचा वापर केला आहे, जो बांगलादेशातील ग्रामीण बँकेने सुरू केला होता. या कर्ज सुविधेद्वारे महिलांना ५० हजार रुपयांची मदत मिळते.

या आयपीओचे नियोजन आयसीआयसीआय सिक्युरिटीज, सीएलएसए इंडिया, जेएम फायनान्शिएल आणि आयआयएफएल सिक्युरिटीज या संस्था करणार आहेत. कंपनीच्या आयपीओच्या प्राइस बँड आणि लॉट साईजबद्दल कंपनीने अजून जास्त माहिती दिलेली नाही.

अभिप्राय द्या!