अनेकांना क्रेडिट स्कोअर कसा तपासायचा हे माहित नसते. आता तुम्ही एक्सपेरियन इंडियाच्या नवीन सेवेअंतर्गत व्हॉट्सअ‍ॅपवर तुमचा क्रेडिट स्कोअर विनामूल्य तपासू शकता. क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीज (रेग्युलेशन) ऍक्ट २००५ अंतर्गत परवाना मिळालेला एक्सपेरियन इंडिया हा भारतातील पहिला क्रेडिट ब्युरो आहे. बुधवारी (१० नोव्हेंबर) एक्सपेरियनने एका सेवेची घोषणा केली आहे. ज्या अंतर्गत भारतीय ग्राहक WhatsApp वर त्यांचा क्रेडिट स्कोअर मोफत तपासू शकतात.

  • प्रथम Experian Indiaच्या WhatsApp क्रमांकावर (+९१-९९२००३५४४४) वर ‘Hey’ पाठवा
  • त्यानंतर काही आवश्यक तपशील शेअर करा जसे- तुमचे नाव, ई-मेल आयडी आणि फोन नंबर.
  • यानंतर तुम्हाला तुमचा एक्सपेरियन क्रेडिट स्कोअर व्हॉट्सअ‍ॅपद्वारे त्वरित मिळेल.
  • तुम्ही एक्सपेरियन क्रेडिट रिपोर्टच्या पासवर्ड संरक्षित प्रतसाठी विनंती करू शकता, जी तुमच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर पाठवली जाईल.
  • तुमचा क्रेडिट स्कोअर ७०० किंवा त्यापेक्षा जास्त असेल तेव्हा बँका सहजपणे कर्ज देतात, पण अर्जदार जर क्रेडिट स्कोअर वारंवार तपासत असेल तर त्याला कर्ज मिळण्यात अडचणी येऊ शकतात. कारण यामुळे बँक त्यांच्या क्रेडिट स्कोअरमधून काही गुण वजा करते. त्यामुळे जर तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर तुमचा क्रेडिट स्कोअर वारंवार तपासण्याची सवय थांबवा.

अभिप्राय द्या!