चालू आर्थिक वर्षात (२०२२-२३) भारताची अर्थव्यवस्था ६.९ टक्के दराने वाढेल, असा अंदाज जागतिक बँकेने वर्तवला आहे. यापूर्वी जागतिक बँकेने भारताची अर्थव्यवस्था ६.५ टक्के दराने वाढण्याचा अंदाज व्यक्त केला होता. रशिया-युक्रेन युद्ध आणि जागतिक स्तरावरील कडक आर्थिक धोरणांमुळे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जागतिक बँकेने भारताचा विकासदराचा अंदाज ६.५ टक्क्यांवर आणला होता. तर या पूर्वीचा अंदाज ७.१ टक्के होता, पण आता पुन्हा एकदा जागतिक बँकेने त्यात बदल करून त्यात वाढ केली आहे.
- Post published:December 6, 2022
- Post category:घडामोडी
- Post comments:0 Comments