शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी आता महत्त्वाची बातमी आहे. बाजार नियामक सेबीने प्रमुख स्टॉक एक्स्चेंज नॅशनल स्टॉक एक्सचेंजला (एनएसई) त्यांच्या प्लॅटफॉर्मवर एक वेगळा विभाग म्हणून सोशल स्टॉक एक्सचेंज सुरू करण्यासाठी अंतिम मंजुरी दिली आहे. एनएसईने गुरुवारी याबाबत माहिती देताना सांगितले की सेबीकडून २२ फेब्रुवारी रोजी मार्केट एक्सचेंजला अंतिम मंजुरी मिळाली आहे. सोशल स्टॉक एक्स्चेंजवर फक्त सामाजिक उपक्रमांच्या शेअर्सची खरेदी-विक्री केली जाईल.

एनएसईचे सोशल स्टॉक एक्सचेंज सुरु करण्यामागचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे समाजाच्या भल्यासाठी काम करणारे ट्रस्ट आणि चॅरिटेबल संस्थांना (NPOs) शेअर बाजारातून निधी उभारण्यास मदत करण्याचा आहे. भारतापूर्वी सोशल स्टॉक एक्सचेंज आधीच इंग्लंड, कॅनडा आणि ब्राझील सारख्या देशांमध्ये कार्यरत आहे. SSE वर फक्त सोशल एंटरप्रायझेसचे (NPOs आणि चॅरिटेबल ट्रस्ट) शेअर्सचे व्यवहार केले जातील.

अभिप्राय द्या!