येत्या एक ते दीड महिन्यात जवळपास ९ कंपन्या आयपीओ आणण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आयपीओतून नफा कमावणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे.
डिसेंबरमध्ये आलेल्या काही आयपीओंची कामगिरी चांगली राहिली नव्हती. यानंतर शेअर बाजारातील कमकुवत कल पाहता गुंतवणूकदार आणि कंपन्यांनी सावधगिरी बाळगण्यास सुरुवात केली. त्यामुळे अनेक कंपन्यांनी आयपीओ आणण्याचे टाळले. आता मात्र एका महिन्यात ९ आयपीओ येणार आहेत. एवलॉन टेक्नोलॉजीज, कॅपिलरी टेक्नोलॉजीज, कॉगेंट सिस्टम्स, डिवगी टॉर्कट्रांसफर सिस्टम्स, मॅनकाइंड फार्मा, नेक्सस मॉल आरईआईटी, सिग्नेचर ग्लोबल, टीव्हीएस सप्लाय चेन आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक यासारख्या कंपन्या आयपीओ आणण्याच्या तयारीत आहेत.