गेल्या दोन महिन्यात मला आमच्या नातेवाईकांचे दोन विवाहसोहळे अगदी जवळून पाहता आले.
एक विवाह त्रिवेंद्रम येथील होता तर दुसरा मुंबई येथील!!
दोन्ही विवाहात एक कॉमन फॅक्टर म्हणजे नवरा व नवरी उच्चशिक्षित आणि आय.टी. किंवा तत्सम क्षेत्रात आपले भविष्य
आजमावणा-यापैकी होते.
तीन दिवस चाललेल्या या सोहळ्याचा खर्च माझ्या अंदाजाने किमान रु.२५ ते ४० लक्ष च्या घरात असावा.
खर्चाचे वर्गीकरण साधारणत: खालीलप्रमाणे दिसते.
जेवण- हॉल ८ ते १० लक्ष, कपडे ,पाहुण्याची सरबराईसाठी वाहन वापर, यावरील खर्च ४ ते ५ लक्ष, दागदागिने, फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी किमान १० लक्ष !!
यामध्ये नवरा नवरीच्या कपड्यासाठी किमान दोन लक्ष तरी खर्च केले जातात. या खरेदीतील कपडे नवरा किंवा नवरी पुन: क्वचितच वापरतात. दागिन्यातील गुंतवणूक तशी फारशी उपयोगी पडत नाही.
तीन दिवसात झालेल्या जेवणावळीतील खर्च हा कितपत उपयुक्त असतो याचाही विचार केला तर खूप काही मोठे हाती लागते असेही नाही. एकंदरीत हा विवाहाचा खर्च दिवसेदिवस वाढतच राहणार हे निश्चित दिसत आहे.
आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण आपण खर्च करून किती मोठ्या प्रमाणात मेमोरेबल करतो हे दाखविणे हा ब-याच जणांचा यामागील हेतू असतो, असेही असे सोहळे पाहिल्यावर जाणवते.
आणि हा खर्च दोन्ही कुटुंबांनी काही मर्यादेपर्यंत सीमित राखावा असेही सांगावेसे वाटत आहे. म्हणून
1) दागदिन्यावरील खर्चाचा उपयुक्तता वाढविण्याच्या दृष्टीने दोन्ही बाजूनी प्रत्यक्ष दागिने खरेदी न करता गोल्ड बाँड किंवा डीजिटल गोल्ड खरेदी करणे सर्वार्थाने हितावह ठरेल.
2) नवरा / नवरीचे कपडे प्रत्यक्ष खरेदी करण्यावर भर देण्यापेक्षा अत्यंत कमी दराने भाडे कराराने काही चांगल्या प्रकारचे कपडे मिळू शकतात. त्याचा उपयोग आपण आपण केला तर उरलेली रक्कम नव्याने संसारात प्रवेश करणाऱ्या कुटुंबाला आपल्या भविष्यासाठी वापरणे सहज सोपे होईल.
3) विवाहविधीच्या वेळी होणारा जेवण व हॉल भाडे यावरील खर्च मात्र कसा कमी करता येईल हा प्रश्न ज्याचा त्याने विचार करून सोडविणे हिताचे राहील. तीच बाब फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी संबधी!!
एकंदरीत उगाचच आणि उपयुक्तता नसलेला खर्च शक्यतो टाळून शिल्लक राहिलेला निधी आपल्या भविष्यासाठी चांगल्या ठिकाणी गुंतविणे निश्चितच सर्वाच्याच हिताचे ठरेल आणि त्यादृष्टीने सर्व विवाहइच्छुकांनी आतापासून विचार केला तर चांगले होईल असे वाटत आहे.
किंवा अशा खर्चासाठी आपले मुल चार/पाच वर्षांचे होताक्षणी एक longterm एस आय पी सुरू करून मुलांच्या विवाहसोहळ्यासाठीची तरतूद सुरु करणे अत्यंत हितावह होऊ शकेल !!