अनेक लोकांचे वाजवीपेक्षा कितीतरी जास्त पैसे त्यांच्या बॅंकेच्या चालू किंवा बचत खात्यात पडून असतात. चालू खात्यावर शून्य, तर बचत खात्यातील रकमेवर  ४ टक्के व्याज मिळते व आणि ते मोजण्याची बॅंकेची पद्धत निराळी आहे. त्यापेक्षा हेच पैसे जर म्युच्युअल फंडांच्या लिक्विड योजनांमध्ये ठेवले तर त्यावर अधिक व्याज किंवा परतावा मिळू शकतो.

बॅंका सहसा फक्त सहा दिवसांपर्यंच्या मुदत ठेवी स्वीकारत नाहीत, परंतु लिक्विड योजनांमध्ये तुम्ही पैसे एक दिवसासाठीसुद्धा ठेवू शकता. तसेच ते एक दिवसाच्या “नोटिसी’मध्ये परत काढता येतात. पैसे थेट बॅंकेत जमा होतात. त्यांचे निव्वळ मालमत्ता मूल्य (एनएव्ही) रोज मोजले जाते, अगदी शनिवार-रविवार आणि सुटीच्या दिवशीसुद्धा. त्यामुळे बहुतेक मोठ्या कंपन्या या योजनांमध्ये शुक्रवारी पैसे ठेवतात व सोमवारी काढून घेतात. कारण शनिवार व रविवार आर्थिक व्यवहार बंद असतात. सध्या या योजनांवर साधारणपणे ७टक्के व्याज मिळते, जे स्थिर नसून बदलते असते. परंतु योजनांमधील एकही पैसा शेअर बाजारामध्ये गुंतविला जात नाही. तो फक्त “डेट’ अर्थात रोखे विभागामध्ये गुंतविला जातो, जो तुलनात्मकदृष्ट्या सुरक्षित असतो. यात मोबाईल आणि ऑनलाइन व्यवहार करता येतात. अशा योजनांत किमान 10 हजार रुपये गुंतविता येतात आणि त्याला कमाल मर्यादा नाही. काही कारणांनी बॅंकेमध्ये जास्त पैसे जमा होत असतात, जसे की मुदत ठेव किंवा विम्याचे पैसे, निवृत्त झाल्यावर “पीएफ’ आणि “ग्रॅच्युइटी’चे पैसे, जमीन अथवा घर विकून आलेले पैसे. या पैशांच्या गुंतवणुकीच्या पुढील योजना ठरेपर्यंत 2 ते 6 महिने हे पैसे बॅंकेत पडून असतात. छोटा-मोठा व्यवसाय असेल तर वारंवार याची पुनरावृत्ती होते, जसे की कामगारांचे पगार, कच्चा माल आणण्यासाठी केलेली तजवीज. यामध्ये लगेच हे पैसे खर्च होत नाहीत. अशा वेळी जर हे पैसे तत्काळ लिक्विड योजनांमध्ये ठेवले तर त्यावर जास्त परतावा मिळविता येऊ शकतो. एक कोटी रुपये जर फक्त प्रत्येक शनिवार व रविवार अशा दोन दिवसांसाठी जरी गुंतविले तरी वर्षाला साधारणपणे एक लाख रुपये मिळतात, जे बॅंकेमध्ये मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त आहेत.आपण असा फायदा घ्यायला शिकलेच पाहिजे !!

This Post Has 4 Comments

 1. Rajaram Chiplunkar

  SIP चा लाँगफॉर्म काय सर?

  1. Pradeep Joshi

   systematic investment plan

 2. Rajaram Chiplunkar

  या योजनेत गुंतवलेले पैसे व मिळालेलं व्याज हे इन्कमटॅक्स साठी दाखवलं जातं का?

  1. Pradeep Joshi

   ELSS स्कीम मधील व्याज tax फ्री आहे.
   balance scheme मधील पैसे / फायदा एक वर्षानंतर काढल्यास tax फ्री .
   अधिक माहितीसाठी प्रत्यक्ष भेटावे
   विलंबाने उत्तर दिल्याबद्दल क्षमस्व

   आपला
   प्रदीप जोशी

अभिप्राय द्या!