फक्त हॉलमार्क असलेले सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदी-विक्रिचा नियम आज म्हणजे १ एप्रिल २०२३ पासून देशभर लागू करण्यात आला आहे. आजपासून देशभरातील सोनार फक्त ६ अंकी HUID हॉलमार्किंग असलेल्या दागिन्यांच्या विक्री करू शकणार. मात्र, यामध्ये काल म्हणजे ३१ मार्च रोजी काहीसा बदल जाहीर करण्यात आला आहे. सोन्याच्या दागिन्यांसाठी सहा अंकी ‘अल्फान्यूमेरिक HUID’ (हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन) प्रणाली लागू करण्याच्या एक दिवस आधी सरकारने हजारो ज्वेलर्सना मोठा दिलासा दिला आहे.

सरकारने शुक्रवारी सुमारे १६०,००० ज्वेलर्सना जून २०२३ पर्यंत ‘घोषित’ सोन्याचे जुने हॉलमार्क असलेले दागिने विकण्याची परवानगी दिली आहे. म्हणजे ते जुने ४ अंकी हॉलमार्क असलेले दागिने पुढील तीन महिने विकू शकतात.

अभिप्राय द्या!