आता तुमच्याकडे पॅन आणि आधार नसेल तर तुम्ही छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करू शकणार नाही. अर्थ मंत्रालयाने अल्पबचत योजनेत गुंतवणुकीबाबत नियम बदलले आहेत आणि याबाबत अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), सुकन्या समृद्धी योजना (SSY), पोस्ट ऑफिस बचत योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) यासारख्या लहान बचत योजना सुरू करण्यासाठी पॅन आणि आधार अनिवार्य करण्यात आले आहेत. ही अधिसूचना ३१ मार्च २०२३ रोजी जारी करण्यात आली आहे.

लहान बचत योजनांसाठी केवायसी प्रक्रियेचा भाग म्हणून आधार आणि पॅन अनिवार्य करण्यात आले आहेत. आता सरकारी अल्पबचत योजनांसाठी आधार आवश्यक झाले असून गुंतवणूक मर्यादेपेक्षा जास्त असल्यास पॅनकार्डही द्यावे लागणार आहे.

अभिप्राय द्या!