रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची द्विमासिक आढाव्याची बैठक सोमवारपासून सुरू झाली. ही बैठक तीन दिवस (३, ५ आणि ६ मार्च) चालणार असून, या बैठकीतून व्याजदरात आणखी पाव टक्का वाढ करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. या वाढीनंतर रिझर्व्ह बँकेकडून मे २०२२ पासून सुरू असलेले व्याजदर वाढीचे चक्रही थांबण्याचा अंदाज आहे.
चालू आर्थिक वर्षातील पतधोरण समितीची ही पहिली बैठक आहे आणि या बैठकीत देशांतर्गत आणि जागतिक घडामोडींवर विचार केला जाईल. तीन दिवसांच्या मंथनानंतर व्याजदरांबाबत घेतलेल्या निर्णयाची घोषणा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्याकडून गुरुवारी (६ मार्च) घोषणा होणे अपेक्षित आहे. मंगळवारी महावीर जयंतीनिमित्त सार्वजनिक सुटी असल्याने यंदाची बैठक चौथ्या दिवशी गुरुवारपर्यंत लांबणार आहे.