कंडोम आणि प्रेग्नेंसी किट बनवणारी कंपनी मॅनकाइंड फार्मा आपला आयपीओ लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचा आयपीओ ४२००-४७०० कोटी रुपयांचा असू शकतो. हा आयपीओ आल्यास ग्लँड फार्मा आयपीओ नंतरचा दुसरा सर्वात मोठा फार्मा आयपीओ असेल. नोव्हेंबर २०२० मध्ये ग्लँड फार्माचा रु. ६,४८० कोटी रुपयांचा आला होता. मॅनकाइंड फार्माने सप्टेंबर २०२२ मध्ये सेबीकडे आयपीओसाठी अर्ज दाखल केला होता.

मॅनकाइंड फार्मा प्रिस्क्रिप्शन औषधे, ओटीसी उत्पादने आणि पशुवैद्यकीय औषधे तयार करते. प्रेगा न्यूज, मॅनफोर्स, अनवॉण्टेड-२१, एक्नेस्टार, रिंगआउट, गॅस-ओ-फास्ट आणि कब्जएंड अंतर्गत आपली उत्पादने विकते. कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या तपशिलानुसार, कंपनी १४,००० हून अधिक कामगारांना रोजगार देते. कंपनी यूएस, श्रीलंका, कंबोडिया, केनिया, कॅमेरून, म्यानमार आणि फिलीपिन्ससह ३४ देशांमध्ये कार्यरत आहेत. कंपनीचे पांवटा साहिब (हिमाचल प्रदेश), सिक्कीम, विझाग आणि राजस्थानसह २१ ठिकाणी प्लांट आहेत.

अभिप्राय द्या!