एव्हलॉन टेक्नॉलॉजीज या इलेक्ट्रॉनिक उत्पादन सेवा पुरविणाऱ्या आघाडीच्या कंपनीच्या शेअर्सचे लिस्टींग मंगळवारी निराशाजनक झाले. आयपीओमधील ४३६ रुपयांच्या प्रती शेअर्स किमतीच्या तुलनेत शेअर्सचे लिस्टींग ४३१ रुपयांवर झाले. याचा अर्थ आयपीओ गुंतवणूकदारांना लिस्टिंगमध्येच १.१५ टक्क्यांनी तोटा झाला. या कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. आयपीओ ओव्हरसबस्क्राइब झाला होता. परंतु केवळ पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIBs) राखीव असलेला भाग पूर्णपणे भरला होता. सध्या शेअर्स बीएसईवर ४२८.२५ रुपयांवर व्यवहार करत आहेत.

अभिप्राय द्या!