लिक्विड फ़ंड’ (लिफ) कसे काम करतात हे जाणून घेण्याअगोदर लिफ म्हणजे काय, हे समजून घेऊया !!

बऱ्याचदा अशी काही परिस्थिती उद्भवते की अचानक काही थोड्या काळासाठी आपल्या बचत खात्यात काही रक्कम येऊन पडते, जिची आपल्याला लगेचच काही गरज नसते, उदा: मनी बॅक पॉलिसीचे पैसे, शेअर्समधील चढ उताराचा फायदा घेण्यासाठी विकलेल्या शेअर्सचे पैसे किंवा ऑफिस ने दिलेला प्रोत्साहन भत्ता वगैरे.

हे पैसे जर नुसतेच बचत खात्यात राहिले तर 3 ते 4 टक्के व्याज मिळेल. त्यापेक्षा कुठेतरी थोड्या काळासाठी गुंतवले, तर? कारण, अजून सहा महिन्यांनी तुम्हाला नवी बाईक घ्यायची आहे, तेव्हा ते पैसे लागतील, किंवा अजून कशाकरिता…

एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की सर्व परिस्थितींमध्ये, पैसे थोड्या काळासाठी निष्क्रिय असतात. कधी कधी तर या पैशांची आवश्यकता कधी असेल तेही निश्चित नसतं.

अर्थात हे पैसे तुम्ही बँकेत देखील गुंतवू शकता, पण 6 महिन्यांसाठी तेथेही 4 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज मिळत नाही. खेरीज, गरजेच्या वेळी काढण्यासाठी तुम्हाला बँकेत जाणं हे अपरिहार्य असतं.

पण पैसे गुंतवायचे, ते पूर्णतः सुरक्षित असले पाहिजेत कारण 6 महिन्यांनी ते लागणारच आहेत.

म्हणजेच तुम्हाला एक अशी गुंतवणूक हवी, जी :

तुम्ही घरबसल्या करू शकाल
घरबसल्या काढू शकाल
पूर्णतः सुरक्षित असेल
बचत खात्यापेक्षा थोडा जास्तच लाभ होईल.
या सर्व गोष्टींचा विचार करून म्युच्युअल फंडांनी जी योजना बनविली आहे, ती आहे, लिक्विड फ़ंड!

सर्वात महत्वाचे म्हणजे इथे No Entry and Exit चार्ज!

कधीही या, कधीही जा, कसलाच चार्ज नाही.

लिक्विड फंड म्हणजे डेट फंड, जे ट्रेझरी बिले, सरकारी सिक्युरिटीज, रेपो, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट किंवा कमर्शिअल पेपर यासारख्या अल्प मुदतीच्या गुंतवणूकी करतात. सेबीच्या निकषांनुसार, लिक्विड फंडांना केवळ 91 दिवसांपर्यंतची मॅच्युरिटीज (अंतिम देय तारीख)असलेल्या डेट आणि मनी मार्केट सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी आहे.

लिक्विड फंडाचा परतावा हा सिक्युरिटीजच्या बाजारभावावर अवलंबून असतो. तथापि, अल्प मुदतीच्या सिक्युरिटीजच्या किंमतीत दीर्घ मुदतीच्या रोख्यांइतका बदल होत नसल्यामुळे, अन्य कर्ज फंडांच्या तुलनेत लिक्विड फंड्सचे परतावे अधिक स्थिर असतात.

सेबीच्या नियमानुसार त्यांना ‘धोकादायक’ (risky) क्षेत्रांत गुंतवणूक करण्यास पूर्ण मनाई असते. त्यामुळे गुंतवणूकदारांचा पैसा अधिक सुरक्षित राहतो. त्याचप्रमाणे, एकूण जमाराशींच्या 20 टक्के रक्कम रोख अथवा मनी मार्केट सिक्युरिटी मध्ये ठेवणेही बंधनकारक असते, जेणेकरून जेव्हा जेव्हा गुंतवणूकदार पैसे परत मागतील, तेव्हा ते सहजपणे देणे सुकर व्हावे.

सरकारी रोख्यांवर मिळणारे व्याज, हे यांचे उत्पन्न! गेल्याच महिन्यात, 20 ऑगस्टला जे नवीन रोखे बाजारात आले, त्यावर व्याजदर आहे 7.15%.

खर्च वजा जाता गुंतवणूकदाराला 6 टक्के परतावा जरी ते देऊ शकले, तरी ते गुंतवणूकदारांच्या फायद्याचे असते, कारण बचत खात्यावरील व्याजापेक्षा ते नक्कीच जास्त असते!

काही चांगल्या लिफ चे 1 वर्षाचे परतावे इथे देत आहे:

IDBI Liquid Fund Direct Growth : 5.2%
Quant Liquid Direct Plan Growth : 5.8%
Tata Liquid Fund Direct Growth. : 5.1

यातील गुंतवणूक आणि इतर माहितीसाठी आमच्याशी संपक साधावा अशी विनंती !!

प्रदीप जोशी ९४२२४२९१०३

अभिप्राय द्या!