विवाह हा नवदाम्पत्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा प्रसंग असतो. आपापल्या कुवतीप्रमाणे खर्च करून हा सोहळा जास्तीत जास्त कसा चांगला करता येईल यासाठी संबंधित प्रयत्नशील असतात. आजकाल ‘डेस्टिनेशन वेडिंग’सुद्धा मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहेत. बऱ्याचदा प्रत्यक्ष विवाह ठरल्यानंतर पुढील ४-६ महिन्यांत विवाह समारंभ ठरविला जातो व त्यानुसार विवाह स्थळ, मंगल कार्यालय, हॉटेल किंवा एखादे विशिष्ट स्थळ (डेस्टिनेशन) ठरविले जाते. विवाह समारंभात प्रामुख्याने सोने, कपडे, मंगल कार्यालय/ हॉटेल, जेवणावळी, मेहंदी, व्हिडीओ शूटिंग यावर खर्च होणार असतो व याचे पूर्वनियोजन आणि तयारी केली जाते. अर्थात त्यासाठी आवश्यक ते पेमेंट करावे लागते. काही वेळा नैसर्गिक आपत्ती किंवा दुर्घटनेमुळे हा समारंभ पुढे ढकलावा लागतो किंवा रद्द करावा लागतो. यातून होणारे आर्थिक नुकसान ही एक चिंतेची बाब असते. या समस्येवर योग्य त्या विमा कवचाची ‘वेडिंग बेल इन्शुरन्स पॉलिसी’ घेऊन संभाव्य आर्थिक नुकसान टाळता येऊ शकते. असे असले तरी आजही बऱ्याच जणांना अशी विमा पॉलिसी मिळू शकते याबाबत माहिती दिसून येत नाही.

अभिप्राय द्या!