देशांतर्गत बाजारात यशस्वी स्टॉक लिस्टिंगच्या तिसऱ्या दिवशी मॅनकाइंड फार्मा अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. करचुकवेगिरीच्या आरोपावरून प्राप्तिकर विभागाने आज देशातील सर्वात मोठी फार्मास्युटिकल कंपनी मॅनकाइंड फार्माच्या कार्यालयात झडती घेतली, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयकर विभाग दिल्ली आणि आसपासच्या भागात कंपनीच्या परिसराची झडती घेत असून कागदपत्रांची तपासणी केली जात असताना लोकांचीही चौकशी करत आहे.

कंपनीचे शेअर्स मंगळवारी स्टॉक एक्स्चेंजमध्ये यशस्वीरित्या सूचिबद्ध झाले. कंपनीने अलीकडेच प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) लाँन्च केला होता. मॅनकाइंड फार्मा ही विविध फार्मास्युटिकल्स उत्पादनांची उत्पादक आहे. दरम्यान, दिल्ली कार्यालयात आयकर विभागाच्या छाप्याच्या वृत्ताचा कंपनीच्या शेअर्सवरही परिणाम झाला. आजच्या व्यवहार सत्रात कंपनीचे शेअर्स ५.५% पर्यंत घसरले.

अभिप्राय द्या!