शेअर बाजारातून सात शेअर्स डिलिस्ट होणार आहेत. डिलिस्टिंग अशी एक प्रक्रिया आहे, ज्याद्वारे सूचीबद्ध कंपनी शेअर बाजारातून काढून टाकली जाते. त्यानंतर त्या कंपनीचा शेअर्स ट्रेडिंगसाठी उपलब्ध नसतो. प्राइम डेटाबेसच्या आकडेवारीनुसार, ७ शेअर्स शेअर बाजारातून डिलिस्ट होणार आहेत.

पर्ल अपार्टमेंट्स
हाऊसिंग फर्म पर्ल अपार्टमेंट्सचे डिलिस्टिंग १७ मे २०२२ रोजी उघडण्यात आले आणि आज म्हणजेच १६ मे २०२३ रोजी पूर्ण होईल. ऑफरनुसार नकुल सेठ अधिग्रहण करत आहेत. डिलिस्टिंगसाठी ४४.०५ रुपयांची ऑफर किंमत निश्चित करण्यात आली असून ऑफरचा आकार ०.२१ कोटी रुपये आहे.

अमृत कॉर्प
अमृत कॉर्पची डिलिस्टिंग ऑफर ३ जून २०२२ रोजी उघडली आणि २ जून २०२३ रोजी बंद होईल. डिलिस्टिंगसाठी ९४५ रुपयांची ऑफर किंमत निश्चित करण्यात आली आहे.

भाग्यनगर प्रॉपर्टीज लिमिटेड
या शेअर्सची डिलिस्टिंग ऑफर १९ डिसेंबर २०२२ रोजी सुरू झाली असून १८ डिसेंबर २०२३ रोजी बंद होईल. डिलिस्टिंग अंतर्गत ४२.२५ रुपयांची ऑफर किंमत निश्चित करण्यात आली आहे.

डीएफएम फूड्स
डीएफएम फूड्स ही अन्न आणि अन्न प्रक्रिया उद्योगाशी संबंधित कंपनी देखील शेअर बाजारातून बाहेर पडणार आहे. डिलिस्टिंग ऑफरसाठी 467 रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे.

गोल्डक्रेस्ट कॉर्प
गोल्डक्रेस्ट कॉर्पच्या डिलिस्टिंगसाठी २०० रुपयांची ऑफर किंमत निश्चित करण्यात आली आहे. या शेअर्सच्या डिलिस्टिंगची ऑफर १२ ऑक्टोबर २०२२ रोजी सुरू झाली असून १२ ऑक्टोबर २०२३ रोजी बंद होईल.

इंटरनॅशनल कन्स्ट्रक्शन
या कंपनीची डिलिस्टिंग ऑफर १२ जानेवारी २०२३ रोजी उघडली आणि १२ जानेवारी २०२४ रोजी बंद होईल.

टीसीआय डेव्हलपर्स
या कंपनीची डिलिस्टिंग ऑफर १८ नोव्हेंबर २०२२ रोजी उघडली गेली आणि १७ नोव्हेंबर २०२३ रोजी बंद होईल.

अभिप्राय द्या!