National Pension Scheme
1) नॅशनल पेन्शन सिस्टीमचे (एनपीएस) खाते कुठे आणि असे उघडता येते?
एनपीएसचे खाते राष्ट्रीयीकृत बँका,पोस्ट ऑफिसम एचडीएफसी बँक, कीटक बँक,आयसीआयसीआय बँक,अॅक्सिस बँक यासारख्या मोठ्या खासगी बँक,काव्ही,स्टॉक होल्डिंग कॉपोरेशन या ठिकाणी उघडता येते. या शिवाय एनएसडीएल; तसेच काव्हींच्या संकेतस्थळावर लॉंग-इन करून ऑनलाईन ई-एनपीएस खाते उघडता येते.
२) हे खाते कोणास उघडता येते?
हे खाते निवासी; तसेच अनिवासी भारतीयास वय वर्षे १८ ते ७० च्या दरम्यान उघडता येते.तसेच खाते केवळ एकाच्याच नावाने उघडता येते. संयुक्त नावाने उघडता येत नाही.
३) या खात्यातील गुंतवणुकीचे काय फायदे आहेत?
ही दीर्घकालीन गुंतवणूक असून, त्यातून सेवानिवृत्ती नियोजन (रिटायरमेंट प्लॅनिंग) करता येते.
यातील गुंतवणूक प्राप्तीकर कलम ८० सी व ८० सीसीडी (1) बी अंतर्गत करसवलतीस पात्र असते.
( मात्र, ही सवलत नवी करप्रणाली स्वीकारल्यास लागू होत नाही)
आपण आपले खाते भारतभर कुठेही ऑपरेट करू शकता.
आपण केलेल्या गुंतवणूकीचे व्यवस्थापन अनुभव व व्यावसायिक फंड मॅनेजर करीत असतात व यातून सरासरी ९.५ ते १०.५ टक्क्यांच्या दरम्यान परतावा मिळतो;जो अन्य पर्यायांपेक्षा (पीपीएफ/एनएससी/ बँक एफडी) जास्त आहे.
सेवानित्तीनंतर आपण कलेल्या गुंतवणुकीनुसार तहह्यात पेन्शन मिळते.
टीअर -१ व टीअर-२ खाते म्हणजे काय?
एनपीएसमध्ये टीअर-1 खाते उघडणे बंधकारक असते. तर टीअर-२ उघडणे वैकल्पिक (ऑप्शनल) असते. पेन्शन फक्त टीअर-1,खात्यात असणा-या रकमेतून मिळते व टीअर -1 मधील शिल्लक रक्कम काही ठराविक कारणांसाठीच व ठराविक कालावधीनंतर (फक्त तीन वेळाच )काढता येते.याउलट टीअर-२ खात्यातील रक्कम बचत खात्याप्रमाणे कधीही काढता येते.
या खात्यास नॉमिनेशन करता येते का?
होय,या खात्यास नॉमिनेशन करता येते आणि जास्तीत जास्त तीन नॉमिनी देऊ शकतो आणि त्यांना द्यावयाच्या रकमेची टक्केवारीसुध्दा ठरवू शकतो.
यासंबंधी अधिक माहितीसाठी भेट घ्या – प्रदीप जोशी ९४२२४२९१०३