मेडिक्लेम म्हणजे काय ?
अ) अचानक आलेल्या आजारपणामुळे किंवा
ब) अपघाता मुळे २४ तासा पेक्षा अधिक कालावधी साठी
किंवा
क) २४ तासा पेक्षा कमी कालावधी साठी अगोदरच इन्शुरन्स कंपनी कडून दावा/ क्लेम मंजूर करून
एखाद्या नोंदणीकृत रुग्णालयात मध्ये भरती व्हावे लागल्यास खिशाला न परवडणारा खर्च इन्शुरन्स कंपनी कडून कॅशलेस अथवा अगोदर पैसे भरून मग कागदपत्र इन्शुरन्स कंपनीत दाखल करून परत मिळवता येतो.

मेडिक्लेम असेल तर कोणते खर्च मिळतात.

१)खोलीभडे
२)नर्सिंग चार्जेस
३)डॉक्टर तपासणी चार्जेस
४)डॉक्टर फेरी चार्जेस
५)आय सी यु चार्जेस
६)एन आय सी यु चार्जेस
७)गोळ्या, औषधे , ड्रगस , सलाइन खर्च अर्थात
८)सोनोग्राफी खर्च
९)एम आर आय खर्च
१०)सिटी स्कॅन खर्च (सिटी स्कॅन)
११)रक्त लघवी तपासणी खर्च
१२)रक्त पिशवी खर्च
१३)विशेष लॅबोरेटरी तपासण्या चे खर्च
१४)रुग्णवाहिका खर्च
१५)ओपरेशन थेटर चे भाडे खर्च
१६)डॉक्टर सर्जरी खर्च
असे व आणखी इतर खर्च मिळतात.

मेडिक्लेम काढणे गरजेचे का आहे ?
१)अचानक दवाखान्यात भरती व्हावे लागल्यास खर्चाची पूर्वकल्पना आणि पुरेशी आर्थिक तरतूद केलेली नसल्याने प्रचंड आर्थिक आणि मानसिक ताण येतो.
२)बँकेत बचत अथवा करंट अकाउंट मध्ये बचत करून ठेवलेले पैसे काढावे लागतात.
३)बँकेतली एफ. डी. मोडावी लागते.
४)सोन्याचे दागिने गहाण ठेवावे लागतात किंवा विकावे लागतात.
५)शेअर्स विकावे लागतात
६)नातेवाईक मित्र मंडळी यांचे कडे हातपासरावे लागतात.
७)बँक अथवा खासगी सावकारा कडून कर्ज घ्यावे लागते
८)या खर्चां करिता घर, गाडी जमीन विकताना लोक दिसतात.
९)उपचारासाठी वेळेवर पैसे उपलब्ध न झाल्याने आपल्या प्रिय व्यक्तींना जीव गमवावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत.

मेडिक्लेम असल्यास…

१)आपण निश्चिन्त मनाने मानसिक आर्थिक दृष्ट्या कोणत्याही प्रकारच्या हॉस्पिटल चे खर्चाला सामोरे जाण्याची तयारी असते.
२)हॉस्पिटल मध्ये डिपॉझिट भरण्याची शक्यतो गरज पडत नाही
३)बँक, खाजगी सावकार यांचे कडून कर्ज घ्यायची गरज नाही. घर,गाडी,जमीन,प्लॉट,फ्लॅट,दुकान, विकण्याची वेळ येत नाही.
४)चांगल्या रुग्णालयात ताठ मानेने उत्तम प्रकारची सेवा रुग्णाला घेता येते.
५)नातेवाईक मित्रमंडळी यांचे कडे हात पसरण्याची वेळ येत नाही.
६)भारतात कोठेही मान्यताप्राप्त रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता येते.

मेडिक्लेम ची जेव्हा खऱ्या अर्थाने गरज असते तेव्हा मिळत नाही. आणि वेळेवर मेडिक्लेम घेतली तरी लाभ त्वरीत मिळेलच असे नाही.
मेडिक्लेम पॉलिसी जेवढी जुनी तेवढे सर्व प्रकारचे आजार कव्हर करतो.

🙏❤️🙏

अभिप्राय द्या!