HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आली आहे. जर तुमचेही या बँकेत खाते असेल तर तुमच्यासाठी ही बातमी जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेडच्या विलीनीकरणाची तारीख समोर आली असून हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी मंगळवारी सांगितले की, महामंडळाचे एचडीएफसी बँकेत विलीनीकरण १ जुलैपासून अंमलात येईल. पारेख म्हणाले की, ३० जून रोजी बाजार बंद झाल्यानंतर एचडीएफसी बँक आणि एचडीएफसीच्या बोर्डाच्या बैठका होणार आहेत.

एचडीएफसीचे व्हाईस चेअरमन आणि सीईओ केकी मिस्त्री यांनी सांगितले की, कंपनीचे शेअर्सचे १३ जुलैपासून व्यवहारातून बाहेर होतील आणि एचडीएफसी बँकेच्या अंतर्गत व्यवहार सुरू होईल. एचडीएफसी बँकेने गेल्या वर्षी ४ एप्रिल रोजी सुमारे ४० अब्ज डॉलर किमतीच्या व्यवहारात सर्वात मोठ्या गृह तारण कंपनीचे म्हणजे एचडीएफसीचे अधिग्रहण करण्याचे मान्य केले होते. प्रस्तावित संस्थेची एकत्रित मालमत्ता सुमारे १८ लाख कोटी रुपये असेल. एचडीएफसी बँक आणि एचडीएसएफ लिमिटेड यांच्या विलीनीकरणानंतर एचडीएफसी बँक जगातील पाचवी सर्वात मौल्यवान बँक बनेल.

अभिप्राय द्या!