देशातील फंड घराण्यांपैकी सर्वांत मोठ्या एसबीआय म्युच्युअल फंडाने व्यवस्थापनाखालील मालमत्तेचा (एएमयू) ८ लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत कंपनीच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत ९० हजार कोटी रुपयांची भर पडली आहे. एसबीआय म्युच्युअल फंडाने पुढील वर्ष ते दीड वर्षांच्या कालावधीत व्यवस्थापनाखालील मालमत्ता १० लाख कोटींवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

याबाबत कंपनीचे उपव्यवस्थापकीय संचालक डी.पी.सिंग म्हणाले की, पहिल्या तिमाहीत आमच्या व्यवस्थापनाखालील मालत्तेत ९० हजार कोटींची भर पडली आहे. आधी व्यवस्थापनाखालील मालमत्ता ७.१० लाख कोटी रुपये होती. ती वाढून ८ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. हा टप्पा आम्ही कालच (ता.३) गाठला. आमचे १० लाख कोटी रुपयांचे उद्दिष्ट असून, ते आम्ही वर्ष ते दीड वर्षाच्या कालावधीत गाठू.

एसबीआय म्युच्युअल फंडांचा ८ लाख कोटींच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेसह म्युच्युअल फंड बाजारपेठेतील हिस्सा १८ टक्क्यांवर पोहोचला आहे. कंपनीच्या एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्तेपैकी ५.५ लाख कोटी रुपये समभागांमध्ये आणि उरलेले डेटमध्ये आहेत. दरमहा २ हजार २०० कोटींच्या एसआयपीचा ओघ सुरू आहे, असे सिंग यांना सांगितले.

अभिप्राय द्या!