सर्वांना नमस्कार,

भारतीय शेअर बाजारात आज नव्याने एक उच्चांक स्थापन झाला आहे. अशावेळी अनेकांना कोणते समभाग लॉन्ग टर्म साठी घ्यावेत असा प्रश्न पडतो. बाजार यापेक्षा वर जाईल का?? यापेक्षा खाली आला तर किती खाली येईल? आणि अशावेळी कोणते शेअर्स घ्यावे हे आपल्याला निश्चितपणे समजत नाही यासाठी तज्ञ मंडळींनी विश्लेषण करून पुढील एका वर्षात कोणते shears चांगली पातळी गाठू शकतात ते सांगितले आहे आपल्या माहितीसाठी असे दहा समभाग मी आपल्याला या लेखांमध्ये सांगत आहे.

  1.  ॲक्सिस बँक- हा शेअर आता आहे त्यापेक्षा साधारणपणे पुढील वर्षभरात अकराशे रुपये पर्यंत जाऊ शकतो .या बँकेचे आर्थिक परिस्थिती चांगली आहे वसुली आणि  अद्ययावतीकरण चांगले असल्यामुळे यांचा एनपीए सुद्धा मर्यादित आहे.
  2.  बँक ऑफ बडोदा– याचे पुढील वर्षाचे  उद्दिष्ट रुपये 240 पर्यंतचे आहे. या   समभागाने भक्कम तिमाही निकालाची नोंद केली आहे. कर्ज वितरण तिमाही तत्त्वावर 5.6% ने वाढले आहे कर्ज वितरणातील रिटेल वाढीचा  टक्का हा 50 टक्के पेक्षा जास्त आहे त्यामुळे हा समभाग आपण घ्यावा असे वाटते.
  3.  गोदरेज कंजूमर– पुढील वर्षभरातील याचे उद्दिष्ट कृपया 1130 पर्यंतचे आहे .या कंपनीने ब्रॅण्डेड व्यवसायात 13 टक्क्यांची वाढ दर्शविली आहे तसेच घरगुती कीटकनाशकांच्या श्रेणीने उत्तम कामगिरी केली आहे आणि अशीच कामगिरी पुढील पंधरा ते वीस वर्ष होणार अशी स्थिती कंपनीची आहे त्यामुळे हा समभाग आपल्या पोर्टफोलिओ मध्ये असावा असे वाटते.
  4.  महानगर गॅस अर्थात एमजीएल– या समभागाचे पुढील वर्षाचे उद्दिष्ट रुपये बाराशे पन्नास पेक्षा जास्त दिसत आहे या कंपनीकडे 12 नवीन सीएनजी स्थानके ९२ हजार घरे आणि 115 पीएनजी ग्राहकांची घर आहे तसेच पुढील अनेक वर्षे यामध्ये कायमस्वरूपी बोर पडणार असे निश्चित आहे .आणि कंपनीच्या विस्ताराला कोणताही अडथळा दिसत नाही त्यामुळे हा समभाग सुद्धा एक चांगला समभाग वाटत आहे.
  5.  शोभा- रिअल्टी म्हणजेच गृहनिर्माण क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे आणि शासनातर्फे देण्यात येत असलेल्या गृह बांधणी क्षेत्रातील सर्व बाबींचा फायदा पर्यायाने या कंपनीला होत असल्याने या समभागाचे सुद्धा वाटचाल पुढील वर्षे कृपया 800 पर्यंत होण्याची शक्यता नाकारता येत नाही..
  6.  कॅम्पस– क्रीडा आणि व्यायामासाठीच्या कपड्याने बुटांच्या उद्योगावर हा समभाग अवलंबून आहे. पुढील वर्षापर्यंत या समभागाची वाटचाल रुपये 500 च्या पुढे होऊ शकते असे निश्चित आहे.
  7. सी वाय आय इ एन टी– हा समभाग पुढील वर्षी निश्चितपणे तेराशे 70 रुपयाच्या पुढे जाऊ शकतो.
  8.  पेटीएम– आजकाल पेटीएम कोणाला माहित नाही असा मनुष्य मिळणार नाही आणि याचाच फायदा यासमभागाला होऊन पुढील वर्षी हा समभाग निश्चितपणे चार अंकी उडी मारेल असे वाटत आहे.
  9. बिर्ला  corp– या कंपनीने वार्षिक तत्त्वावर 15 टक्के पेक्षा जास्त उलाढाल होणार असल्याचे निश्चिती गृहीत धरली आहे तसेच सध्या हा शेअर आकर्षक मूल्यांकनावर चालत असल्याने त्याची वाटचाल पुढील वर्षभरात तेराशे रुपयांच्या पुढे होईल असे दिसत आहे..

 

आपण वर निर्देशित केलेले समभाग आपल्या स्वतःच्या अभ्यासानुसार घ्यावेत तसेच या समभागांमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्लाही घ्यावा आणि शेअर मार्केट मधील गुंतवणूक ही बाजाराच्या वर खालीपणावर अवलंबून राहते हे ध्यानी घ्यावे.  धन्यवाद !!

या संबंधात काही शंका असेल तर आपण केव्हाही माझ्याशी संपर्क साधू शकाल.

माझा व्हाट्सअप क्रमांक आहे 9422429103.

प्रदीप जोशी

अभिप्राय द्या!