बजाज फायनान्सतर्फे वेगवेगळ्या मुदतीची कार्पोरेट डिपॉझिट म्हणजेच मुदत ठेवी स्वीकारल्या जातात. आणि त्यातील व्याजदर हे खूप आकर्षक आहेत. या व्याजदरच्या मुदती सुद्धा थोड्या वेगळ्या स्वरूपाच्या आहेत, पंधरा महिने 18 महिने 22 महिने 30 महिने 33 महिने आणि 44 महिने अशा या मुदती आहेत.
44 महिने मुदतीसाठी बजाज फायनान्स तर्फे 8.60% व्याजदर देण्यात येतो. आणि व्याजदरचा परतावा हा आपल्याला हवा तसा स्वीकारण्याच्या यामध्ये सोयी आहेत.
बजाज फायनान्स या कंपनीमध्ये ठेवी या अत्यंत सुरक्षित समजल्या जातात. बजाज फायनान्सला कंपनीला क्रिसिलने ट्रिपल ए रेटिंग दिले आहे.
यामध्ये गुंतवणुकीची सुविधा हे पूर्णतः ऑनलाइन पद्धतीची आहे त्यामुळे आपण ठेवलेल्या पैशांना ठेवल्या दिवसापासूनचे व्याज मिळणे सुरू होते. आवश्यकता असल्यास या ठेवीच्या तारणावर आपल्याला कर्ज मिळण्याची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे.
बँकांमध्ये ठेवीवर व्याजदर कमी होत असताना आपल्याला योग्य ते व्याजदर मिळण्यासाठी आपण बजाज फायनान्स कडे कार्पोरेट ठेवीमध्ये आपली रक्कम ठेवणे केव्हाही हितावह ठरेल.
अधिक माहितीसाठी WA ९४२२४२९१०३
प्रदीप जोशी