गेल्या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टीने केलेल्या रेकॉर्डब्रेक कामगिरीचे प्रतिबिंब इक्विटी म्युच्युअल फंडात देखील पडले

 बहुसंख्या इक्विटी म्युचल फंडांच्या एन ए व्ही देखील त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीला स्पर्श करून आल्याचे चित्र दिसत आहे.

 या तेजीच्या पार्श्वभूमीवर आपण आपली इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक विकून कमावलेला नफा पदरात पाडून घेण्याचा विचार करत असाल तर पुढील मुद्द्यांचा विचार करा.

1)  म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सुरू करताना आपण ठरविलेले उद्दिष्ट साध्य झाले आहे का हे प्रथम पहा. आणि ते उद्दिष्ट साध्य झाले नसेल तर घाई घाईने आपली गुंतवणूक विकून टाकू नये.

2) म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीची विक्री करून मिळणाऱ्या रकमेचे काय करणार याचा आधी विचार करून ठेवा अन्यथा असे पैसे आपल्या बँक खात्यात पडून राहू शकतात किंवा खर्च  होऊन  जातील.

3)आपण गुंतवणूक करत असलेल्या म्युच्युअल फंडाचा एक्झिट लोड काय आहे हेही पहा. एक वर्षाच्या आत आपण गुंतवणूक काढणारअसाल तर साधारणपणे एक टक्का रक्कम एक्झिट लोड म्हणून  वळतीकेली जाते. हे ध्यानी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

4) या उलट एक वर्षानंतर विक्री केल्यास मिळणाऱ्या एकूण नफ्यापैकी पहिला एक लाख रुपयांचा काहीही प्राप्ती कर द्यावा लागणार नाही आणि एक लाखापेक्षा अधिक नफ्यावर दहा टक्के दराने प्राप्त कर द्यावा लागेल हेही लक्षात ठेवावे.

5) आपल्याला जेवढ्या पैशांची तातडीने गरज असते तेवढ्याच म्युच्युअल फंडांचे विक्री करणे  हितावह असते.

6) विक्रीचा निर्णय घेताना आपल्याकडील चांगली कामगिरी करणारे म्युच्युअल फंड विकण्याऐवजी तुलनेने खराब कामगिरी करणारे म्युच्युअल फंड विकावेत.

7) इक्विटी फंडातील रक्कम बॅलन्स फंडात किंवा डेट फंडात वळवून आपल्या गुंतवणुकीतील जोखीम कमी करण्याचा पर्याय देखील विचार करावा.

8) सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण कोणताही निर्णय घेतला तरी भविष्यात देखील चांगल्या म्युच्युअल फंडातील नियमित गुंतवणूक सुरू ठेवणे अत्यंत हितावह आहे हे आपण ध्यानी घ्यावे.

या संबंधात कोणतेही अडचण असल्यास आमच्या कार्यालयाशी केव्हाही संपर्क साधने आपल्या हिताचे राहील.

अभिप्राय द्या!