शेअर बाजारात सध्या मोठ्या प्रमाणावर चढ-उतार सुरू आहेत. बाजारातील अश्या अस्थिरतेमुळे म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक अधिक फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात अनेक नवीन फंड उपलब्ध आहेत. आनंद राठी प्रायव्हेट वेल्थचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी फिरोज अजीज यांनी त्यातील काही फंड गुंतवणूकदारांसाठी सुचवले आहेत.
आनंद राठी प्रायव्हेट वेल्थचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी फिरोज अजीज यांच्यामते;
अॅक्सिस म्युच्युअल फंडचा ”चिल्ड्रन’स गिफ्ट फंड”
अॅक्सिस म्युच्युअल फंडने लहान मुलांसाठी ”चिल्ड्रन’स गिफ्ट फंड” नावाने नवीन फंड सादर केला आहे. ”चिल्ड्रन’स गिफ्ट फंड” मध्ये फक्त अल्पवयीन मुला-मुलींना गुंतवणूक करता येणार आहे. मुला-मुलींच्या वतीने त्यांच्या पालकांना गुंतवणूक करता येणार आहे.
भविष्यात मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घेण्यापेक्षा ”चिल्ड्रन’स गिफ्ट फंड”मध्ये गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर ठरणार आहे. मुलांचे वय 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत लॉक-इन कालावधी असणार आहे.
”चिल्ड्रन’स गिफ्ट फंड” ही ओपन-एण्डेड बॅलेन्स्ड योजना असणार आहे. यातील 60 टक्के शेअर्स आणि शेअर्ससंबंधित डेरिव्हेटिव्ह मध्ये गुंतवणूक करण्यात येणार आहे. तर, ४० टक्के रोख्यांमध्ये गुंतवावे लागणार आहेत.