‘एसआयपी टॉप-अप’ म्हणजे काय ?

‘एसआयपी’च्या माध्यमातून आपण दरमहा ठरावीक रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवत असतो. ‘एसआयपी टॉप-अप’मध्ये आपण दर महिन्याला निश्चित केलेल्या ‘एसआयपी’च्या रकमेत वार्षिक आधारावर वाढ करण्याची सूचना म्युच्युअल फंड कंपनीला देतो .

साहजिकच आपली दीर्घकालीन उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला ‘एसआयपी टॉप-अप’ सुविधा अधिक फायदेशीर ठरते. उदा. प्रकाशने  दरमहा २०,००० रुपयांची ‘एसआयपी’ पुढील २० वर्षांकरिता केली आहे. आणि  राकेश  याने देखील २०,००० रुपयांची ‘एसआयपी’ केली आणि दरवर्षी त्यात २,००० रुपयांची वाढ करण्याची सूचना म्युच्युअल फंड कंपनीस दिली. दरवर्षी उत्पन्नात वाढ झाल्यावर गुंतवणुकीतदेखील वाढ केल्यामुळे राकेशला प्रकाशपेक्षा  खूप जास्त फायदा झाला.

राकेशने दरवर्षी ‘एसआयपी’ची रक्कम २,००० रुपयांनी वाढवल्यामुळे त्याची एकूण गुंतवणूक ९३.६ लाख रुपये झाली आणि २० वर्षांनी त्याला प्रकाशपेक्षा  अंदाजे ६० टक्के जास्त रक्कम म्हणजेच रु ३.१५ कोटी मिळतील. केवळ दरवर्षी दोन हजार रुपये sip मध्ये वाढविल्यामुळे प्रकाशला नेहमीच्या sip पायी  फक्त रु  १.९८ कोटी मिळणार असून राकेशला अंदाजे रु ३.१५ कोटी रक्कम मिळू शकतील .

हे फक्त चक्रवाढ आणि स्टेप अप मुळे होणारे फायदे आहेत !!

एसआयपी टॉप-अप’बद्दल महत्त्वाचे :

१) ‘एसआयपी टॉप-अप’ सुविधेचा मुख्य लाभ म्हणजे दरवर्षी उत्पन्न वाढल्यावर गुंतवणूकदेखील वाढवली जाते आणि मुदतपूर्तीनंतर खूप मोठी रक्कम मिळते.

२) दरवर्षी ठरावीक रक्कम अथवा ठरावीक टक्क्यांनी वाढ असे दोन्ही पर्याय उपलब्ध.

३) मर्यादित कालावधीसाठी ‘एसआयपी’ रकमेत वाढ व त्यानंतर समान ‘एसआयपी’ रक्कम याप्रकारेदेखील नियोजन शक्य आहे.

यासंबंधी अधिक काही माहिती हवी असल्यास माझ्याशी संपर्क साधावा अशी विनंती !!

प्रदीप जोशी 9422429103

अभिप्राय द्या!