सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हे एक संपत्ती निर्मितीचे अत्यंत उत्तम साधन आहे. आणि आता त्यालाच जोडून फ्रीडम एस आय पी म्हणून एक नवीन गुंतवणूक साधन आय.सी.आय.सी.आय prudential तर्फे तयार करण्यात आले आहे.

याच्या नावातच फ्रीडम आहे, फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य आणि इथे अपेक्षित असलेले स्वातंत्र्य हे आर्थिक स्वातंत्र्य अपेक्षित आहे.

आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला दरमहा काही रक्कम एस आय पी द्वारे गुंतवणे आवश्यक आहे. आणि ही रक्कम अपेक्षित निधी एकत्र झाल्यावर दुसऱ्या एका बॅलन्स स्वरूपाच्या फंडामध्ये ट्रान्सफर करून त्यातून एस डब्ल्यू पी म्हणजेच सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लॅन करणे यालाच फ्रीडम एसआयपी असे संबोधले आहे.

याचा कमीत कमी कालावधी गुंतवणुकीसाठी आठ वर्षांचा असून तो साधारणपणे तीस वर्षापर्यंत वाढवता येऊ शकतो,. यातील गुंतवणूक सुद्धा आपल्याला स्टेप अप पद्धतीने वाढविणे शक्य आहे. रुपये पाच हजार दरमहा एसआयपी करून साधारणपणे पंचवीस वर्षे गुंतविल्यास आपल्याला  साधारणपणे एक कोटी रुपये पर्यंतची रक्कम जमवणे सहज शक्य असून या जमा रकमेतून एस.डब्लू. पी. केल्यास त्याद्वारे आपल्याला उर्वरित आयुष्यामध्ये तहहयात रुपये 50 हजार दरमहा प्राप्त होऊ शकतात.

आपल्या मृत्यूनंतर हे जमलेले एक कोटी रुपये व त्यावर अधिकची मिळालेली रक्कम ही पूर्णपणे आपल्या आपण नमूद केलेल्या नॉमिनीला देऊ  शकतो. म्हणजेच वय वर्ष 55 किंवा 60 नंतर पुढील 25 ते 30 वर्षे दरमहा 50000 रुपये मिळून सुद्धा आपली मुद्दल असलेली रक्कम आणि त्यावर मिळालेले अधिकचे व्याज हे आपण आपल्या नॉमिनीला हस्तांतर करू शकतो हे या स्कीमचे वैशिष्ट्य आहे.

आणि आणि म्हणूनच याला फ्रीडम एस आय पी असे नाव दिले आहे. यामध्ये गुंतवणुकीची रक्कम किती असावी हे एकदा ठरविल्यानंतर  आणि त्याची एस आय पी लावल्यानंतर  आपल्याला कोणतीही हालचाल न करता मुदतपूर्ती नंतर अपेक्षित असलेली रक्कम दरमहा आपल्या बँक खात्यात जमा होण्याची सुविधा असल्याने याला आर्थिक दृष्ट्या स्वातंत्र्य होण्याचा एक सुंदर उपाय असे  संबोधलेआहे.

या संबंधात अधिक माहिती किंवा विस्तृत खुलासे हवे असल्यास आमच्या कार्यालयाशी केव्हाही संपर्क साधावा अशी  विनंती आहे अर्थात कार्यालयीन वेळेत. धन्यवाद !!

 प्रदीप जोशी संपर्क 9422429103 

 

अभिप्राय द्या!