आपल्यापैकी बरेच जण आपल्या जीवन विम्याचे प्रीमियम त्रैमासिक किंवा अर्धवार्षिक किंवा वार्षिक स्वरूपाचे ठेवतात.

एलआयसी तर्फे प्रीमियम भरण्याची सूचना साधारणपणे एक महिना आधी प्राप्त झालेली असते .आणि बरेच जण सूचना  मिळूनही आपला प्रीमियम भरताना आज भरू उद्या भरू असे करत विसरून जातात.

अशा विसरलेल्या  प्रीमियम साठी दंड भरून प्रीमियम भरण्याचे सुविधा एलआयसी कार्यालय देते.

पण यापेक्षा अत्यंत सोपी सुविधा फंड बाजारतर्फे देण्यात आली आहे.

 यासाठी आपण फक्त प्रीमियमच्या  प्रमाणात एक एस आय पी म्युच्युअल फंडामध्ये सुरू करायची. पॉलिसी डिटेल्स, प्रीमियमची तारीख आणि काही जुजबी माहिती इन्सर्ट केल्यावर आपल्या एस आय पी  तर्फे जमा  झालेल्या रकमेतून आपला प्रीमियम ऑटोमॅटिकली आपल्या पॉलिसीला वळता करण्याची ही सुविधा आहे.

या सुविधेमुळे आपल्या हप्ता भरण्याची तारीख चुकली अशी वेळ यापुढे आपल्याला येणार नाही. आणि एसआयपी मध्ये जमा रकमेवर थोडेफार व्याज मिळणे सुद्धा सुरू राहू शकेल की ज्याचा फायदा आपले प्रीमियम संपल्यावर आपल्याला निश्चितपणे मिळू शकेल.

म्हणजेच एक एस आय पी सुरू करा आणि आपले प्रीमियम भरा अशा स्वरूपाची ही योजना आहे.

या योजनेसंबंधी अधिक माहिती घेण्यासाठी आपण केव्हाही आमच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता !!

अभिप्राय द्या!