म्युच्युअल फंडांच्या विविध प्रकारातील अनेकांना परिचित नसलेला एक प्रकार म्हणजे आर्बिट्राज फंड.

 इतर फंडापेक्षा कामकाजाची थोडी वेगळी पद्धत असलेल्या या फंडाकडे गेल्या काही महिन्यात पुन्हा गुंतवणुकीचा ओघ सुरू झालेला दिसत आहे.

 याचे कारण म्हणजे बाजारात असलेली  volatality  आहे.

आर्बिट्राज फंड त्यांच्या एकूण मालमत्तेपैकी कमीत कमी 65 टक्के गुंतवणूक कॅश मार्केटमध्ये आणि वायदा बाजारातील व्यवहारांमध्ये करतात.

म्हणजेच अशा स्वरूपाचे फंड कॅश मार्केटमध्ये ज्या  कंपन्यांचे शेअर्स खरेदी करतात त्याच कंपन्यांच्या शेअर्स वायदा बाजारात म्हणजेच फ्युचर मार्केटमध्ये विकतात आणि महिनाअखेरीस जेव्हा वायदा बाजारातील व्यवहारांची पूर्तता होते तेव्हा खरेदी विक्रीच्या भावातील फरकातून फायदा कमवतात.

सन 23 – 24 च्या अर्थसंकल्पातआर्बिट्राज फंडातील गुंतवणुकीतून होणाऱ्या फायद्यावर कमी दराने प्राप्तिकर द्यावा लागणार आहे त्यामुळे जे लोक अधिक प्राप्तिकर भरतात त्यांना याचा फायदा होणार आहे म्हणूनआर्बिट्राज फंडाकडे लोकांचा ओढ वाढत आहे.

शेअर मार्केटमध्ये जेव्हा volatality  असते तेव्हा अशा स्वरूपाच्या फंडातील गुंतवणूक आपल्याला चांगला परतावा देते.

आणि यासाठी किमान सहा महिन्यापेक्षा जास्त काळ आपण या फंडामध्ये गुंतवणूक केल्यास आपल्याला चांगला परतावा प्राप्त होऊन  कमी दराने टॅक्स भरावा लागल्याने अल्टिमेटली आपला फायदा होऊ शकतो.

पण यातील गुंतवणूक करताना आपण आपल्या सल्लागाराचा सल्ला घेणे निश्चितच फायदेशीर होऊ शकेल.

आपला टॅक्स slab कोणता आहे? आपली रिस्क टेकिंग  कॅपॅसिटी किती आहे ?या सगळ्यावर आपली गुंतवणूक आणि त्याचा काळ आपण ठरविणे अत्यंत हिताचे होऊ शकेल. बाजारामध्ये सध्या खालील आर्बिट्राज फंड उपलब्ध आहेत.

  • एसबीआयआर्बिट्राज अपॉर्च्युनिटी फंड
  •  इन्वेस्को इंडिया आर्बिट्राज फंड
  • एडलवाईज आर्बिट्राजट्रान्सफंड
  • एचडीएफसी आर्बिट्राज फंड
  •  कोटक आर्बिट्राज फंड
  • यासंबंधी आधी माहित्सती आमच्याशी केव्हाही संपर्क करावा !!
  • प्रदीप जोशी 9422429103

अभिप्राय द्या!