पोस्ट बँक, इन्शुरन्स पॉलिसी ,सोने यासारख्या गुंतवणुकीच्या पारंपारिक पर्यायांपेक्षा शेअर तसेच म्युच्युअल फंडात दीर्घकालीन गुंतवणूक केल्याने जास्त परतावा मिळत असल्याचे दिसून आले आहे. सुशिक्षित मध्यमवर्गीय, श्रीमंत गुंतवणूकदार , शेअर आणि म्युच्युअल फंडात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत असल्याचे दिसते.
कोरोना महामारीच्या काळात भारतात मोठ्या प्रमाणावर डिमॅट खाते उघडली गेली आणि अशी खाते उघडण्याचे सातत्य वाढत आहे.
या नव्याने उघडलेल्या डिमॅट खात्यातील गुंतवणूकदार दीर्घकालीन उद्देशाने गुंतवणूक करतात असेही जाणवत आहे. शेअर्समधील गुंतवणूक साधारणपणे 12 ते 15 टक्के परतावा देते तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक दीर्घकाळ ठेवल्यास त्याचा परतावा ही साधारणतः 15% च्या आसपास आहे असे दिसून येत आहे.
या गुंतवणुकीला जरी लिक्विडिटी असली तरी गरजेच्या वेळी शेअर्स किंवा म्युच्युअल फंड विकून पैसे मिळवणे हे बरेच लोकांना आवडत नाही. आणि त्यासाठी लोन against शेअर किंवा लोन against म्युच्युअल फंड युनिट हा पर्याय वापरणे अत्यंत सुटसुटीत आहे .
अशा स्वरूपाचे कर्ज प्राप्त करणे खूप सोपे असून याला तारण लागत नाही.
आपले शेअर्स हेच तारण असतात. डिमॅट खात्यावर असलेल्या शेअर्सच्या प्रचलित बाजारभावाच्या 50 टक्के कर्ज मिळते आणि जास्तीत जास्त कर्जाची रक्कम ही वीस लाखापर्यंत मर्यादित आहे .
अशाप्रकारे मिळणारे कर्ज हे दोन पद्धतीत मिळते.
पहिली पद्धत आहे overdraft म्हणजे तात्पुरती उचल .आपण आपण जेवढे शेअर्स तारण ठेवू त्याच्या प्रपोर्शनने आपल्याला overdraft मिळतो. आणि आपण हवी तेवढी रक्कम हव्या त्या वेळी वापरल्यावर आपल्याला तेवढ्या रकमेवरच व्याज भरावे लागते.
दुसरी पद्धत आहे एक रकमी कर्जाचे वितरण !! अशा स्वरूपाच्या कर्जाची परतफेड जास्तीत जास्त तीन वर्षात दरमहा हप्त्याने करायचे असते . यात भरलेली रक्कम पुन्हा काढता येत नाही. यालाच डिमांड लोन असे म्हटले जाते. ही सुविधा वैयक्तिक गरज भागवण्यासाठी अत्यंत सोयीचीआहे . या दोन्ही पद्धतीवर आकारण्यात येणारे व्याज हे साधारणपणे नऊ टक्के ते साडेदहा टक्के या दरम्यान असते.
कर्जाचा वापर कशासाठी करावा यावर कोणतेही बंधन नाही. कर्ज घेऊन शेअर्स किंवा म्युच्युअल फंड खरेदी किंवा इंट्राडे ट्रेडिंग सुद्धा करणे शक्य आहे.. ‘
आपण ज्या शेअर्सवर कर्ज घेतले आहेत ते आपल्याच डिमॅट अकाउंट मध्ये pledge होऊन राहतात. त्यामुळे कंपनीतर्फे मिळणारा डिव्हीडंड, मिळणारा बोनस ,किंवा अन्य स्वरूपाचे फायदे हे आपल्याला मिळणे सुरू राहते. जर आपण घेतलेले कर्ज पुन्हा फेडलेच नाही तर कर्ज देणारी संस्था आपले शेअर्स विकून आपले कर्ज वसूल करते.
अशा स्वरूपाचे कर्ज घेण्याचे फायदे खालील प्रमाणे आहेत.
कर्ज सहजगत्या प्राप्त होते आणि व्याजदर कमी असतो.
या कर्जाला जामीन द्यावे लागत नाही तसेच कर्ज रक्कम आपल्या हव्या त्या कामासाठी आपण वापरू शकतो .
overdraftस्वरूपाचे कर्ज घेतल्यास आपल्या शेअर्सचा बाजार भाव किंवा फंड युनिटची बाजारातील किंमत जशी वाढते तशी आपली कर्ज मर्यादा सुद्धा वाढू शकते. त्यामुळे अशा स्वरूपाचे कर्ज घेणे हे अत्यंत हितावह आहे. आणि याची प्रोसेस सुद्धा अत्यंत सोपी आहे. प्रथमतः काही कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर अशा स्वरूपाची मर्यादा वाढवणे किंवा कमी करणे हे एका pledge formवर अवलंबून आहे.
त्यामुळे आपल्या ठेवी न मोडता शेअर्स न विकता म्युच्युअल फंड करता कर्ज मिळण्याची लोन against शेअर्स ही सुविधा अत्यंत हितावह आहे. आणि याचा फायदा आपण सर्वांनी घेणे कायमस्वरूपी आपल्या फायद्याचे होऊ शकेल.
या संबंधात अधिक माहिती हवी असल्यास आपण आमच्या कार्यालयाशी केव्हाही संपर्क साधू शकता. धन्यवाद !!
आपला
प्रदीप जोशी 9422429103