चांद्रयान-३ आपल्या मिशनच्या अगदी जवळ आले आहे. गुंतवणूकदारांच्या अपेक्षाही यामुळे वाढत आहेत. चांद्रयान-३ च्या या प्रवासात भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) व्यतिरिक्त अनेक कंपन्यांनीही मोठी भूमिका बजावली आहे. मिशन यशस्वी झाल्यास या कंपन्यांच्या शेअर्समध्ये बंपर उसळी येण्याची शक्यता आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. ते चांगलेच मालामाल होणार आहेत. या शेअर्समध्येही काही काळ सातत्याने वाढ होताना दिसत आहे. जर भारताचे अंतराळ यान चंद्रावर यशस्वीरित्या उतरले तर ते देशातील खाजगी अवकाश कंपन्यांसाठी गुंतवणुकीचे नवीन मार्ग आणि संधी उघडतील. या मिशनशी संबंधित ५ कंपन्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
लार्सन आणि turbo
L&T च्या एरोस्पेस मॅन्युफॅक्चरिंग सुविधेने चांद्रयान-३ साठी स्पेस हार्डवेअर आणि बूस्टर सेगमेंट तयार केले आहेत. अम्बिलिकल प्लेट पुरवण्यासोबतच, कंपनीने लॉन्च व्हेईकलच्या सिस्टम इंटिग्रेशनमध्येही मदत केली आहे.
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स म्हणजेच BHEL च्या शेअर्सही वाढ होत आहे. चांद्रयान-३ मोहिमेसाठी BHEL ने इस्रोला बॅटरीचा पुरवठा केला आहे.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स
हिंदुस्तान एरोनॉटिक्सने चांद्रयान-३ च्या निर्मितीसाठी अनेक आवश्यक घटक पुरवले आहेत. हा शेअर सध्या ३८१५ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.
सेंटम इलेक्ट्रॉनिक्स
आतापर्यंत सेंटम इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने वेगवेगळ्या अंतराळ मोहिमांसाठी सुमारे ५०० घटक पुरवले आहेत. सेंटम इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे शेअर्स गेल्या पाच दिवसांत ६ टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. शेअर्स सध्या १३८५ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहेत.
वालचंदनगर इंडस्ट्रीज
गेल्या एका महिन्यात वालचंदनगर इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये १० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. आज या शेअर्समध्ये घसरण होत असली तरी गेल्या महिन्याभरात यात वाढ झाली आहे. वालचंदनगर इंडस्ट्रीजनेही इस्रोला अनेक महत्त्वाचे घटक दिले आहेत.