देशातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) आता एका नवीन क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अलीकडे झालेल्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) त्यांनी मोठी घोषणा केली. त्यांच्या या घोषणेने आता एलआयसीसह (LIC) देशातील सर्व विमा कंपन्यांसमोर आव्हान आणखी वाढले असेल. रिलायन्स लवकरच विमा क्षेत्रात उतरणार असल्याची मुकेश अंबानी यांनी घोषणा केली. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसद्वारे ग्राहकांना विमा उत्पादने पुरवली जातील.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या विलगीकरणानंतर अलीकडेच जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसची स्थापना करण्यात आली. त्यानंतर जिओ फायनान्शियल देशांतर्गत शेअर बाजारात सूचिबद्ध करण्यात आले असून आता कंपनीत नव्या सेवेची भर पडणार आहे. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या माध्यमातून लोक जीवन विमा, सामान्य विमा आणि आरोग्य विमा यांच्याशी संबंधित उत्पादनांचा लाभ घेऊ शकतील. अशाप्रकारे विमा क्षेत्रात रिलायन्सनी एंट्री घेताच एलआयसीसह सर्वच विमा कंपन्यांसमोरील आव्हाने वाढतील.

अभिप्राय द्या!