रिषभ इन्स्ट्रुमेंट्सचा आयपीओ आज ३० ऑगस्ट रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडला असून गुंतवणूकदार या आयपीओमध्ये १ सप्टेंबरपर्यंत गुंतवणूक करू शकतील. आयपीओ उघडण्यापूर्वी अँकर गुंतवणूकदारांकडून १४७.२ कोटी रुपये कंपनीने उभे केले आहेत. कंपनीने आयपीओसाठी ४१८-४४१ रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित केला असून या आयपीओच्या माध्यमातून सुमारे ३९१ कोटी रुपये उभारण्याचा कंपनीचा मानस आहे.
१६ गुंतवणूकदारांची गुंतवणूक
अँकर बुकच्या माध्यमातून एकूण १६ गुंतवणूकदारांनी कंपनीत गुंतवणूक केली आहे. या गुंतवणूकदारांमध्ये एचडीएफसी म्युच्युअल फंड, निप्पॉन लाइफ, सुंदरम म्युच्युअल फंड, बंधन म्युच्युअल फंड, आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स, क्वांट म्युच्युअल फंड, टाटा मल्टीकॅप फंड आणि 3P इंडिया इक्विटी फंड I यांचा समावेश आहे.
संबंधित तपशील
या आयपीओ अंतर्गत ७५ कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील. याशिवाय, ९४.३ लाख शेअर्सची विक्री ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत कंपनीच्या विद्यमान भागधारक आणि प्रवर्तकांकडून ४१५.७८ कोटी रुपयांना केली जाईल. ऑफर फॉर सेलचा भाग म्हणून आशा नरेंद्र गोलियांचे १५ लाख शेअर्स, ऋषभ नरेंद्र गोलियांचे चार लाख शेअर्स, नरेंद्र ऋषभ गोलिया एयचूएफचे ५.१८ लाख शेअर्स आणि SACEF होल्डिंग्ज II द्वारे ७०.१ लाख शेअर्स विकले जातील.
कंपनीबद्दल जाणून घेऊया
ऋषभ इन्स्ट्रुमेंट्स ही इलेक्ट्रिकल ऑटोमेशन उपकरणे डिझाईनिंग, डेव्हलपिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि पुरवण्यात गुंतलेली एकात्मिक कंपनी आहे. कंपनी मीटरिंग, नियंत्रण आणि संरक्षण उपकरणे, पोर्टेबल चाचणी आणि मोजमाप साधने आणि सोलर स्ट्रिंग इनव्हर्टरमध्ये व्यवहार करते.