देशातील सर्वच बँकांतून दावा न केलेले कोट्यवधी रुपये सध्या पडून आहेत. यापैकी काही रकमेसाठी दावेदार पुढे येतही आहेत. मात्र हे दावेदार ती रक्कम ज्यांच्या खात्यात आहे त्यांचे खरे वारसदार आहेत की नाही, हे पाहणे संबंधित बँकेसाठी मोठीच डोकेदुखी होऊन बसले आहे. तोतया दावेदारांच्या हातात एखाद्या मृत खातेदाराची किंवा ठेवीदाराची लाखो रुपयांची रक्कम जाऊ नये यासाठी यावर उपाय करण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रत्येक बँक करते. तरीही विनादावा रक्कम चुकीच्या व्यक्तीकडे जाण्याचा धोका उरतोच हा धोका बऱ्यापैकी कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने विशेष पोर्टल १७ ऑगस्ट रोजी सुरू केलं. याचं नाव आहे – उद्गम (UDGAM म्हणजे अनक्लेम्ड डिपॉझिट्स – देटवे टू ॲक्सेस इन्फर्मेशन). आपल्या प्रियजनांची विनादावा रक्कम नेमकी कोणत्या बँकेत किंवा बँकांमध्ये आहे हे खऱ्या वारसदाराला ऑनलाइन शोधता यावं या उद्गम पोर्टलचा उद्देश आहे.

मुदतपूर्तीनंतर ठेवीची रक्कम दोन वर्षांपर्यंत कुणी घ्यायला न आल्यास ती ठेव अकार्यरत होते.

  • १० वर्षे वाट पाहून मग बँक अशी खाती व ठेवी रिझर्व्ह बँकेच्या डिप़ॉझिटर्स एज्युकेशन अँड अवेअरनेस फंडात जमा करते.

  • या खात्यांतील रकमेवर ११ मे २०११पासून किमान ३ टक्के वार्षिक सरळव्याज मिळते.

अभिप्राय द्या!