माझ्या ओळखीत एक गृहस्थ निवृत्त झाल्यावर त्यांनी त्यांची गुंतणूक वेगवेगळ्या फंडाद्वारे उचित सल्ला घेऊन केली व त्यांनी आपल्या पत्नीला Nominee पण केले. दुदैवाने त्यांचे निधन झाल्यावर पत्नीकडून या गुंतवणुकीवर सातत्त्याने लक्ष ठेवणे थोडेफार दुर्लक्षित झाले. दरम्यानच्या काळात पॅन-आधार व बँक खाते जोडल्याने फसवणूक करणाऱ्या टोळीने या महिलेचे आधार कार्ड, cell phone वाल्याकडून मिळवून दुसऱ्या खाजगी बँकेत खाते उघडले. त्यामध्ये तिचा कायमचा पत्ता तोच ठेवला व संपर्कीचा पत्ता नवीन(खोटा) टाकला. तसेच संपर्क क्रमांकही नवीन बदलून टाकला.
नंतर मात्र नव्या बँक खात्याचा संदर्भ वापरून म्युच्युअल फंडामध्ये सुद्धा संपर्क पत्ता/ दूरध्वनी क्रमांक व बँक खाते क्रमांकही बदलला. ज्यायोगे तिला तिच्या फोलिओमधील बदल लक्षात येणे कठीण होऊ शकते. यानंतर Redemption होऊन तिचे म्युच्युअल फंडामधील पैसे नव्या ‘बोगस’ बँक खात्यात वळविणे सोपे होऊ शकते व ही फसवणूक लक्षात यायला खूप कालावधी जाऊ शकतो.
ही बाब फक्त आर्थिक फसवणूकपुरती मर्यादित राहत नसून तुमची ‘ओळख’ बदलण्याचीही आहे. त्यामुळे आपण दर सहा महिन्यांतून एकदा आपली गुंतवणूक/पत्ता/Email/Cell No. या बाबी बरोबर आहेत ना याची खातरजमा करणे आवश्यक आहे
आणि म्हणून—–
- KYC संबधी पॅन/ आधार / voter ID हे कागदपत्र स्वैरपणे कोणालाही हाताळू देऊ नका.
- साक्षांकित करताना दिनांक व कारण लिहिणे उचित.
- गुंतवणुकीचे statement सहा महिन्यातून एकदा तपासा व विश्वासू सल्लागाराकरवी सर्व व्यवहार दक्षतापूर्वक पहा.
थोडक्यात दक्ष राहा !!