लार्ज कॅप फंड म्हणजे मोठ्या “बाहुबली ” कंपन्यांचा समावेश असलेला फंड होय !

“लार्ज कॅप’ कंपन्यांचे भागभांडवल आणि उद्योगविस्तार खूप मोठा असतो. त्यामुळे अशा शेअरमध्ये गुंतवणूक करणे तुलनेने सुरक्षित ठरते. शिवाय वर्षानुवर्षे नफ्यात चाललेल्या या कंपन्या लाभांश, बोनस शेअर, हक्कभाग (राईट शेअर) यासारखे फायदे गुंतवणूकदारांना नियमितपणे देत असतात, ज्याचा अप्रत्यक्ष फायदा “लार्ज कॅप’ म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांना होतो. अशा फंडात दीर्घकाळासाठी नियमितपणे “एसआयपी’च्या मार्गाने गुंतवणूक करत राहणे, हा आर्थिक यश मिळविण्याचा राजमार्ग म्हणता येईल. उदाहरणार्थ, “एचडीएफसी टॉप 200′ या “लार्ज कॅप’ फंडामध्ये वर्ष 1997 ते 2016 या वीस वर्षांत दरमहा दहा हजार रुपये “एसआयपी’ मार्गाने गुंतविलेल्या एकूण 24 लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे आजचे बाजारमूल्य जवळ जवळ 2 कोटी 90 लाख रुपये आहे. शिवाय या गुंतवणुकीतून मिळालेला संपूर्ण नफा हा दीर्घकालीन भांडवली नफ्याच्या नियमानुसार पूर्णपणे प्राप्तिकरमुक्त आहे. अर्थात “लार्ज कॅप’ फंडांची वाढ सावकाश होते, कारण ज्या मोठ्या कंपन्यांमध्ये या फंडांची गुंतवणूक असते, त्या कंपन्यादेखील सकारात्मक दिशेने; परंतु सावकाश वेगाने वाढत असल्याने अशा फंडातील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्यासाठी धीर धरावा लागतो. म्हणूनच गुंतवणुकीतील शिस्त आणि संयम पाळू शकणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदाराच्या भात्यात एक तरी चांगला “लार्ज कॅप’ फंड दीर्घकाळासाठी असावा, असे वाटते.

गेल्या पाच वर्षांत उत्तम कामगिरी केलेले काही “लार्ज कॅप’ फंड पुढीलप्रमाणे: मिरे ऍसेट इंडिया ऍपॉर्च्युनिटीज फंड, एसबीआय ब्लुचिप फंड, बिर्ला सनलाईफ टॉप 100 फंड, रिलायन्स टॉप 200 फंड, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल फोकस्ड ब्लूचिप इक्विटी फंड, यूटीआय इक्विटी फंड.

यामध्ये गुंतवणूक करताना SIP चा पर्याय सर्वोत्तम !! तसेच ज्यांना SIP शक्य नाही त्यांचेसाठी flexi SIP सुद्धा उपलब्ध आहे !! अधिक माहीतीसाठी संपर्क करणे उत्तम !!

अभिप्राय द्या!