रिझर्व्ह बॅंकेने रेपो दर ‘जैसे थे’च ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो दर६.२५ टक्‍क्‍यांवर कायम ठेवण्यात आला असून रिव्हर्स रेपो दरदेखील 6 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला. तसेच एसएलआरमध्ये 0.5 टक्क्यांची कपात करण्यात आली असून रोख राखीव प्रमाण 4 टक्क्यांवर कायम  ठेवण्यात आले आहे. बुडीत कर्ज आणि महागाईवर लक्ष ठेऊन असल्याचे आरबीआयने सांगितले आहे.
रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीची दोन दिवसीय बैठक काल आणि आज मुंबईत पार पडली. पतधोरण समितीमधील पाच सदस्यांनी व्याजदर कायम ठेवण्यास सहमती दर्शवली. याआधी 6 एप्रिल रोजी पार पडलेल्या पतधोरण आढाव्यात रेपो दर ६.२५टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला होता. मात्र, रिव्हर्स रेपो दर 0.२५ टक्क्याने वाढवून६ टक्के करण्यात आला होता.

शेतकरी कर्जमाफीबाबत रिझर्व्ह बँकेने सावध पवित्रा घेतला आहे. कर्जमाफीमुळे वित्तीय तूट वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मॉन्सूनची कामगिरी आणि वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहिल्यास महागाई नियंत्रणात राहील. त्यानंतर व्याजदराबाबत व्यापक निर्णय घेता येईल, असे DG आचार्य यांचे मत दिसते !!

अभिप्राय द्या!

Close Menu