भारतीय अपारंपरिक ऊर्जा विकास संस्था मर्यादित अर्थात इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लि.- इरेडाच्या शेअर बाजारात नोंदणीचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने कंपनीच्या प्रारंभिक समभाग विक्रीस(इनिशिअल पब्लिक ऑफरिंग-आयपीओ) मान्यता दिली आहे.
प्रस्तावित योजनेत, इरेडा १३.९० कोटी नव्या शेअर्सची विक्री करणार आहे. सध्या कंपनीकडे ७८  कोटी शेअर्स आहेत. कंपनी या योजनेतून नेमके किती भांडवल उभारणार हे नंतरच्या टप्प्यात स्पष्ट होईल. मात्र, किरकोळ गुंतवणूकदार आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांना 5 टक्के सवलत दिली जाणार आहे.  केंद्रीय मंत्रीमंडळाच्या मंजुरीनंतर पुढे 180 दिवसांमध्ये कंपनीची नोंदणी होईल.
इरेडा ही केंद्र सरकारच्या नवीन व पुनर्वापरयोग्य ऊर्जा मंत्रालयाच्या अधिपत्याखालील ‘मिनी-रत्न’ कंपन्यांपैकी एक सार्वजनिक वित्तीय संस्था आहे. कंपनी सध्या स्वच्छ ऊर्जेसाठी 13,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu