UTI तर्फे नवी सोय
सध्या कोणत्याही म्युचुअल फंडामध्ये गुंतवणूक केल्यास त्याचा फायदा गुंतवणूक करणाऱ्याला किंवा दुदैवाने त्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदारालाच मिळतो. पण UTI च्या या नव्या योजनेत गुंतवणूक करणाऱ्याच्या आई-वडिलांना सुद्धा लाभ मिळण्याची सोय या नव्या योजनेत आहे.
या योजनेचे नाव आहे,
“UTI FAMILY” – (Father And Mother I Love You)
आपल्या वृद्ध आई किंवा वडिलांना या योजनेद्वारे दरमहा काही रक्कम देण्याची सोय यामध्ये असून आई किंवा वडील यांना या योजनेत सहभागी होताना कोठेही सह्या करण्यासाठी बाहेर पडण्याची सुद्धा आवश्यकता नाही.
गुंतवणूकदार मुलाने आपली गुंतवणूक UTI Wealth Builder Fund किंवा UTI MIS Advantage Plan यामध्ये ठेवून दरमहा SWP (Systematic Withdrawal Plan) द्वारे आपली आई किंवा वडील यांच्या बँक खात्यात या गुंतवणुकीपैकी ८% ते १०% रक्कम वळती करण्याची सूचना फंड हाउसला दिली की काम फत्ते.
१. हा फायदा गुंतवणूक करणाऱ्याच्या (1st Holder) आई किंवा वडिलांनाच मिळू शकतो.
२. SWP ची कमीतकमी रक्कम रु.१००० असणे अपेक्षित आहे. SWP चा कालावधी दरमहा राहील.
ही सोय नव्या तसेच जुन्या गुंतवणूकदाराला मिळू शकते. आपण बाहेरगावी असलो तरी आपल्या आई-वडिलांना भावानात्मक दृष्ट्या आधार देणारी ही नवीन योजना असल्याने याचा फायदा आई-वडिलांपासून दूर कामानिमित्त बाहेरगावी राहणाऱ्या कोणाही मिळवत्या व्यक्तीला घेणे शक्य आहे.