म्युच्युअल फंडांमार्फत शेअर बाजारात होणारी गुंतवणूक दोन वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोचली आहे. सरलेल्या मे महिन्यात म्युच्युअल फंड कंपन्यांनी शेअर बाजाराशी निगडीत योजनांमध्ये तब्बल 10,790 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. गेल्यावर्षी मे महिन्यात हा आकडा 4,721 कोटी रुपये होता.
म्युच्युअल फंडांविषयी जगजागृती निर्माण करण्यासाठी हाती घेण्यात आलेले उपक्रम आणि गुंतवणूकदारांमध्ये उत्साह वाढत चालल्याने गुंतवणूकीत विक्रमी वाढ नोंदविण्यात आली. याअगोदर जून 2015 मध्ये शेअर बाजारात या मार्गाने 12,273 कोटी रुपये गुंतवणूकीचा विक्रमी ओघ दाखल झाला होता. मे अखेर म्युच्युअल फंडांची व्यवस्थापनांतर्गत मालमत्ता 5.83 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोचली.
सलग चौदाव्या महिन्यात म्युच्युअल फंडांमार्फत शेअर बाजारात गुंतवणूकीचा ओघ कायम आहे. यासाठी बँकांचे घटते व्याजदर हे महत्वाचे  कारण असू शकते !!

अभिप्राय द्या!

Close Menu