Diversified Equity Fund म्हणजे काय?

Large Cap म्हणजे मोठ्या स्थिर असलेल्या कंपन्या. Mid Cap म्हणजे येत्या काही वर्षात मोठ्या उलाढालीकडे वाटचाल करीत असलेल्या कंपन्या व Small Cap म्हणजे काही वर्षातच Mid Cap व Large Cap या segment मध्ये जाऊ शकतील अश्या कंपन्या होत.

या सर्व कंपन्यांमध्ये जे फंड आपली गुंतवणूक करतात त्या सर्व फंडांना “Diversified Equity Fund” असे म्हणतात. अशा फंडांना Flexi Cap फंड असेही  संबोधले जाते. या फंडातील मुख्य उद्देश गुंतवणूक वृद्धी हा असला तरी Large Cap मधील गुंतवणूक स्थैर्य देते व Mid Cap मधील गुंतवणूक बहुतांशी वृद्धी देते.

काही फंड आपली थोडी गुंतवणूक DEBT प्रकारात सुद्धा करतात व बाजारातील उतरणीच्या काळात फंड NAV कमी होणार नाही याचीही दक्षता घेतात. आज Sensex हा त्याच्या उच्चतमपातळीच्या आसपास आहे अशा वेळी गुंतवणूक करताना साधारणतः सावधानता पाळावी असा मतप्रवाह असतो. पण भारताची अर्थव्यवस्था सध्या चांगल्या स्थितीत असल्याने असा धोका वाटण्याचे काही कारण नाही. GDP Growth चांगली आहे. बँकांचे NPA कमी करायच्या दृष्टीने योग्य ती पाऊले उचलली जात आहेत. चीनच्या अर्थव्यवस्थेमधील वृद्धी वाढती नसून थोडीफार उतरतीच आहे असे दिसते. तसेच गेल्या वर्षभरात परदेशी गुंतवणूक खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेली नाही. तसेच Domestic Institutional Investors भरपूर पैसा खरेदीसाठी घालताना दिसत आहेत. हे सर्व पाहता NIFTY लवकरच .१०००० ते .११००० ही पातळी महिन्याभरात किंवा येत्या सहा महिन्यात निश्चितच गाठणार आहे. येत्या जुलैपासून GST ची अंमलबजावणी होऊन करप्रणालीत सुसूत्रता असल्याने थोडाफार महागाई दर तात्पुरत्या प्रमाणात वाढला तरीही अनेक गोष्टी व करप्रणाली मध्ये उचित बदल झाल्याने अर्थव्यवस्थेला निश्चितपणे चांगली दिशा मिळेल असे चित्र आहे.

म्हणून या स्थितीत Diversified Equity Fund मध्ये SIP करणे निश्चितच हितावह असून Lump sum गुंतवणूक सुद्धा अत्यंत चांगला परतावा  देऊ शकेल असे म्हणणे चुकीचे होत नाही. या दृष्टीने Franklin India Flexi Cap फंड हा अत्यंत चांगला फंड गुंतवणुकीसाठी धनलाभ तर्फे सुचविण्यात येत आहे. तसेच याच प्रकारात ICICI Pru value Discovery फंड सुद्धा गुंतवणुकीसाठी अत्यंत चांगल्या स्वरूपाचा आहे असे गुंतवणूकदाराला सुचविण्यात येत आहे.

 

अभिप्राय द्या!