सामान्य माणसाने सुद्धा आपली बचत योग्य सल्ल्याद्वारे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणे अधिक फायद्याचे आहे त्याची कारणे आज विशद करण्यात येत आहेत.

१.व्यावसायिक व्यवस्थापन :

म्युच्युअल फंडांकरता जे पैसे जमा केले जातात त्याचे व्यवस्थापन मालमत्ता व्यवस्थापन कंपनीकडून  केले जाते.  एएमसीकडे मोठे कौशल्य आणि अनुभव असतो. त्यामुळे ते अर्थव्यवस्था, कंपन्या आणि बाजारपेठेचा नियमितपणे अभ्यास करत असतात.

परिणामी ते गुंतवणुकीचा योग्य निर्णय घेऊ  शकतात. हे करणे छोटय़ा किरकोळ गुंतवणूकदाराला करणे शक्य नसते.

फंड व्यवस्थापकाकडे वेळ असतो आणि त्याचबरोबर माहिती गोळा करण्यासाठी, संकलन, संशोधन करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ असते तसेच ते विविध कंपन्यांच्या व्यवस्थापनाशी बोलूही शकतात.

२.गुंतवणुकीचे पर्याय आणि लवचीकता :

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांना पुढील गोष्टींचा निर्णय तीन गोष्टींचा अभ्यास करून करण्याची गरज आहे :

धोका पत्करण्याची क्षमता, गुंतवणुकीचा कालावधी आणि गुंतवणुकीचे लक्ष्य. या गोष्टींनुसार दिर्घकालीन, मध्यम आणि छोटय़ा कालावधीसाठी गुंतवणूक करणे आवश्यक असून त्यानुसार फंड घराणी विविध योजना (इक्विटी, डेट आणि हायब्रीड) तयार करतात. यामुळे वाढ,व  लाभ  असे पर्याय उपलब्ध होत असतात.

जर गुंतवणूकदाराला धोका, कालावधी आणि लक्ष्याविषयी माहिती असेल तर बाजारपेठेतील माहितीनुसार किंवा व्यावसायिकांकडून सल्ला घेऊन योजनेची  निवड करणे सोपे जाते.

३. सोपी पद्धत आणि द्रव्यता :

कोणतीही व्यक्ती ही एकरकमी ५००-१,००० रुपयांनी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकते. तसेच एसआयपीच्या माध्यमातून रु. ५० किंवा १०० रुपये प्रति महिनासुध्दा गुंतवणूक करू शकतात.

म्युच्युअल फंडातील रक्कम सहज प्राप्त करणे शक्य होते.  लिक्विड फंडात गुंतवलेले पैसे हे २४ तासात प्राप्त करता येतात आणि अन्य फंडांतील पैसे हे तीन दिवसांत मिळविता येतात.

धोक्याचे घटक : ओपन एन्डेड स्कीममधील युनिट हे कोणत्याही वेळी मिळवले किंवा परत केले जाऊ शकतात. तर क्लोज्ड एन्डेड योजनांमधील गुंतवणूक ही केवळ योजना कालावधी करता असते व त्याचे पैसे परिपक्वतेच्या वेळीच मिळू शकतात.

गुंतवणूकदार हे क्लोज्ड एन्डेड फंडातून बाहेर पडण्यासाठी ते युनिट ‘सेकंडरी मार्केट’मध्ये विकू शकतात व त्यातून पैसे मिळवू शकतात.  कर बचत फंडाच्या बाबतीत पाहिल्यास करसवलत मिळवण्यासाठी गुंतवणूकदारांना युनिट हे ‘लॉक इन पिरिएड’ संपेपर्यंत ठेवणे गरजेचे असते.

one time mandate हा फॉर्म भरून दिल्यास एका क्लिक वर पैसे काढणे व ठेवणे सुद्धा साध्या  सेल फोनधारकलाही सहज शक्य आहे .

यासंबंधी अधिक माहिती हवी असल्यास शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाशी सुटीचे दिवस सोडून केव्हाही संपर्क साधावा. यासंबंधातील विस्तृत माहिती विनामूल्य दिली जाते .

This Post Has One Comment

  1. Vijay

    लार्ज कँप फंडाची इत्यादी
    ची माहिती छान आहे.

अभिप्राय द्या!