मोबाईल आधारित कर्ज सुविधा

 

वित्तीय क्षेत्रातील नवोद्योगी उपक्रम ‘पे सेन्स’ने व्यक्तिगत कर्जप्राप्तीची प्रक्रिया अधिक सोपी आणि सहजसाध्य बनविली आहे. विशेषत: कोणतेही क्रेडिट कार्ड, कर्जविषयक पूर्वेतिहास नसणाऱ्या नवव्यावसायिक अथवा नव्याने नोकरीला लागलेल्या तरुणांसाठी अल्पतम कागदपत्रांसह पाच हजारांपासून ते एक लाखांपर्यंतचे व्यक्तिगत कर्ज तातडीने उपलब्ध करून देणारा हा पर्याय लोकप्रियही ठरत आहे.

नुकतीच व्यावसायिक जीवनाला सुरुवात झाली आहे; पहिल्या नोकरीतून सुरू झालेल्या वेतनलाभासह अनेक स्वप्ने आकार घेत आहेत.  या नवतरुणाईच्या स्वप्न-आकांक्षांच्या पंखांचा पसारा अथांग आहे. कुणाला चालू नोकरीसह आपली निपुणता आणखी वाढविण्यासाठी नवे शिकत जाण्याची इच्छाआहे, तर कुणाला व्यावसायिक भरारीसाठी नव्या सामग्री व खेळत्या भांडवलाची गरज आहे. अशांसाठी ‘पे सेन्स ईएमआय’ हा आपला अत्यंत सोपा व्यक्तिगच कर्जाचा प्रकार खूपच उपयुक्त ठरला आहे. आतापर्यंत एक लक्षाहून अधिक ग्राहकांना याद्वारे कर्ज वितरण केले आहे !!

बँकांच्या तुलनेत व्यक्तिगत कर्जासाठी (पर्सनल लोन) व्याजाचे दर तुलनेने अधिक असले तरी ते क्रेडिट कार्डापेक्षा स्वस्त आणि अत्यंत सोपी प्रक्रिया व तात्काळ उपलब्धता यामुळे पे-सेन्स ईएमआयला पाठबळ वाढत आहे.

कोणताही पत-इतिहास,  न पाहता, तंत्रज्ञानाधारित प्रणालीतून कर्जइच्छुक ग्राहकांची समाजमाध्यमातील सक्रियता, त्याच्या फोनमधील संपर्क सूची वगैरे पडताळून पेसेन्सद्वारे विनाविलंब कर्जमंजुरी दिली जाते. ‘ई-केवायसी’च्या दृष्टीने आवश्यक आधार क्रमांक, पॅन क्रमांक, बँक खाते क्रमांक मिळवून कर्ज वितरण थेट बँक खात्यात काही तासांच्या आत करणारी ही सुविधा तरुणांना खूप आवडते .

सध्या मुंबई, पुणे, दिल्ली,  बंगळुरू, चेन्नई या सात शहरांमध्ये कार्यरत असलेल्या  पेसेन्स सेवेची पुढील काही महिन्यांत देशव्यापी विस्ताराची योजना आहे.

 

अभिप्राय द्या!