रिलायन्स जिओने 4जी क्षेत्रात केलेल्या दमदार प्रवेशानंतर आता लवकरच डीटीएच क्षेत्रात प्रवेशाची सुरूवात केली आहे. एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार आता रिलायन्स लवकरच डीटीएच सेवेचा शुभारंभ करणार आहे. ‘जनसत्ता डॉट कॉम’ने दिलेल्या वृत्तानुसार रिलायन्स जिओच्या डीटीएच सेवेसाठी नोंदणी सुरू झाल्याचे बोलले जात आहे.

रिलायन्स जिओने ज्याप्रमाणे सुरुवातीचे काही महिने मोफत 4जी आणि मोफत कॉल्स करण्याची ऑफर देऊ केली होती त्याचप्रमाणे आता ग्राहकांना सुरुवातीचे काही महिने मोफत डीटीएच सेवा पुरवणार आहे. त्यामध्ये ग्राहकांना 50 एचडी चॅनेल बघता येणार आहे. तर एकूण 432 चॅनेल पाहता येणार आहे.

रिलायन्स जिओच्या ब्रॉडबँड आणि डीटीएचच्या बाजारातील प्रवेशामुळे प्रतिस्पर्धी कंपन्यांना म्हणजेच टाटा स्काय, व्हिडिओकॉन आणि एअरटेलला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

BSNL च्या सेवेत कंटाळलेल्या ग्राहकांना हा सुखद पर्याय असेल अशी अपेक्षा !!

अभिप्राय द्या!