16 जूनपासून दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात . मात्र, तुम्हाला आता मोबाईलवरुन पेट्रोल, डिझेलचे रोजचे दर कळू शकतील. एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या दररोज बदलणाऱ्या किंमतींबाबत पेट्रोलपंप चालक आणि सरकारमध्ये वादविवाद सुरु असताना तेल कंपनी इंडियन ऑईलने ग्राहकांसाठी ही खास सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

वाहनधारकांना फ्युएल@आयओसी या अॅप्लिकेशनवरुन पेट्रोल आणि डिझेलच्या दररोज बदललेल्या किंमतींची माहिती कळु शकेल. याशिवाय, एसएमएसवरुनदेखील किंमती तपासता येतील. यासाठी RSP<SPACE>DEALER CODE to 92249-92249 एसएमएस पाठवावा लागेल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलपंपचालक पेट्रोल, डिझेलची बदललेल्या किंमतीची दररोज विक्री सुरु करण्यापुर्वी खात्री करुन घेतील. सर्व पेट्रोलपंपांवर एकच दराने पेट्रोलची विक्री केली जाईल.

अभिप्राय द्या!

Close Menu