म्युच्युअल फंड गुंतवणुकीत महाराष्ट्र सर्वांत आघाडीवर
नोटाबंदीपूर्वी देशात (पॅन इंडिया) म्युच्युअल फंडातील गुंतवणूक 14 लाख कोटी रुपये होती. नोटाबंदीनंतर ती 19 लाख कोटी रुपयांवर पोचली. दरवर्षी देशभरात “एसआयपी’च्या (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) माध्यमातून दरमहा 2 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक होत होती, ती आज 4 हजार 500 कोटींहून अधिक झाली आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यात आघाडीवर असलेल्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्र सर्वात आघाडीवर आहे. 19 लाख कोटी रुपयांमध्ये एकट्या महाराष्ट्रातून 7 लाख 22 हजार 842 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. त्यामध्ये एकट्या पुण्यातून 77 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. महाराष्ट्रात मुंबईपाठोपाठ सर्वाधिक म्युच्युअल फंडात पुणेकरांची गुंतवणूक होत  आहे.

गेल्या वर्ष-दोन वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात मंदीचे वातावरण आहे. त्यातच 8 नोव्हेंबर 2016 रोजी केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा परिणाम बॅंका आणि बांधकाम व्यवसायावरही झाला आहे. कर्ज उचलण्याच्या प्रमाणात घट झाल्याने बॅंकाकडून एफडीवरील व्याजदर कमी करण्यात आले. बांधकाम क्षेत्रातील मंदी आणि घटत्या व्याजदरामुळे या क्षेत्रातील गुंतवणूक फारसे लाभदायक नसल्याचे स्पष्ट झाले.

tax बचतीसाठी SIP व आर्थिक ध्येय गाठण्यासाठी SIP करणे सर्वाधिक लाभदायक आहे हे लक्षात आल्याने या क्षेत्रात गुंतवणूक वाढत आहे हे सर्वसामान्यांनी लक्षात घेवून बदल स्वीकारण्यासाठी मानसिक तयारी केली पाहिजे असे धनलाभ चे सर्वाना सांगणे आहे !

अभिप्राय द्या!